Crop Insurance News: पीक विमा भरण्यासाठी अतिरिक्त पैसे घेण्यात येत असतील तर “या” ठिकाणी करा तक्रार | कृषि आयुक्त यांचे प्रसिद्धीपत्रक पहा
Crop Insurance: सन २०२३-२४ च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा (Crop Insurance) योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन २०२३-२४ पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे.
सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा (Crop Insurance) क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी हंगामाकरीता शेतक-यांना केवळ रु.१ भरुन पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली आहे.
तर, सन २०२३-२४ पासून “सर्वसमावेशक पीक विमा योजना” राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्याअनुषंगाने शेतकरी हिस्स्याची विमा हप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे शेतक-यांना केवळ १/- रुपया भरून PMFBY पोर्टल वर स्वत: शेतकरी यांना, तसेच बँक, विमा (Crop Insurance) कंपनी प्रतिनिधी व सामुहिक सेवा केंद्र (CSC) यांचे मार्फत योजनेतील सहभागाची नोंदणी करता येईल.
पीक विमा योजनेत सहभागाची नोंदणी करण्यासाठी सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाला विमा कंपनीमार्फत प्रति अर्ज रक्कम रु. ४०/- देण्यात येते. परंतु राज्यातील काही सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून शेतक-यांकडून अतिरीक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी प्राप्त होत आहेत.
त्या अनुषंगाने सर्व शेतक-यांस आवाहन करण्यात येते की, सामुहिक सेवा केंद्र (CSC) धारकाकडून केवळ रु.१/- रुपया भरुन पीक योजनेत सहभागाची नोंदणी करावी व CSC ने अतिरीक्त रक्कमेची मागणी केल्यास आपल्या संबंधित पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार/तालुका कृषि अधिकारी, जिल्हाधिकारी/जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.
कृषि आयुक्तालय यांच्यामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेले पत्रक खालीलप्रमाणे :
सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांना कृषि आयुक्त यांनी दिलेल्या सूचना :
अधिक वाचा :
* ऊस तोडणी यंत्र अनुदान साठी निधि उपलब्ध
* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार
* मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे‘ मोठे निर्णय
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा
* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण
* “या” शेतकर्यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता