Crop Insurance : एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

 

Crop Insurance : सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतक-यांना केवळ रु.1  भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्याकरीता “सर्वसमावेशक पीक विमा योजना” ही योजना सन 2023-24 पासुन राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

 

Crop Insurance Scheme
crop insurance

 

सदर योजना अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे खरीप व रब्बी दोन्ही हंगामाकरीता शेतकर्‍यांना केवळ रु. 1 भरुन पीक विमा योजनेचा लाभ घेण्यास मान्यता देण्यात आली होती. (Crop Insurance)

 

 

परंतु, आता राज्य सरकारकडून राबविण्यात येणारी ही 1 रुपयांत पीक विमा (Crop Insurance) योजना बंद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या योजनेत सुधारणा करण्यासंदर्भात कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं राज्य सरकारला अहवाल दिला आहे. 

 

 

कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीनं या अहवालात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी एक रुपयांऐवजी 100 रुपये शुल्क आकारावं, अशी शिफारस समितीनं केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या शिफारशीचा स्वीकार करणार का, ते पाहावं लागेल.

 

 

राज्यात १ रुपयांत पीकविमा योजना मध्ये सीएससी सेंटरकडून मनमानी कारभार सुरू झाल्याची तक्रार शेतकरी हे करत होते. तसेच राज्यातील विविध जिल्ह्यातील सीएससी सेंटरवरुन बोगस पीकविमा उतरवला जात होता. एक अर्जासाठी सीएससी सेंटर चालकाला 40 रुपये राज्य सरकारकडून दिले जात होते. त्यामुळे योजनेचा अधिक लाभ घेण्यासाठी केंद्र चालक बोगस अर्ज भरत असल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली या योजनेचा अभ्यास करण्यासाठी समिति नेमण्यात आली होती. (Crop Insurance)

 

 

समितीनं या अहवालात शेतकऱ्यांना पीकविमा योजनेसाठी एक रुपयांऐवजी 100 रुपये शुल्क आकारावं, अशी शिफारस समितीनं केली आहे. त्यामुळे आता राज्य सरकार या शिफारशीचा स्वीकार करणार का, ते पाहावं लागेल.

 

 

 

हे पण पहा :

 

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

Tags: crop insurance scheme Maharashtra state, pik vima yojana maharashtra, pik vima scheme, peek vima yojana, 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!