MahaDBT Farmer Schemes : महाडीबीटी वर अर्ज करण्याचे आवाहन | लवकरच “या” घटकांची सोडत होणार

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.2/5 - (5 votes)

 

MahaDBT Farmer Schemes : कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज स्वीकारले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते. तर, आता NFSM अंतर्गत लक्षांक पोर्टल वर भरण्यात आला आहे.

 

Mahadbt Farmer Schemes Portal

 

 

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर सन 2024-25 अन्न आणि पोषण सुरक्षा-कडधान्य (NFSM Pulses), भात व गहू तसेच राष्ट्रीय खाद्यतेल (Oilseeds) अभियान-गळीतधान्य अंतर्गत महाडीबीटी वर सिंचन साधने या घटकांचे लक्षांक भरण्यात आले आहेत. चालू वर्षा करिता जे या योजना मध्ये जिल्हानिहाय लक्षांक हे भरण्यात आलेले असून यासाठी शेतकरी बांधवांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत. (MahaDBT Farmer Schemes) 

 

 

ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन? (MahaDBT Farmer Schemes)

 

 

राष्ट्रीय अन्न आणि पोषण सुरक्षा अभियान – कडधान्य, गळीतधान्य या योजना अंतर्गत खालील घटका साठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याचे आवाहन कृषि विभागा मार्फत करण्यात आलेले आहे.

 

1. मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler)

2. पीव्हीसी पाइप (PVC Pipe)

3. तेलघाणा (Oil Extraction Unit)

4. बीज प्रक्रिया ड्रम (Seed Treating Drum)

5. मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील

 

 

वरील घटकांचे लक्षांक हे महाडीबीटी पोर्टल वर भरण्यात आलेले असून लवकरच या घटकांसाठी ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे त्यामुळे इच्छुक शेतकरी बांधवांनी 28 जानेवारी पर्यन्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत. (MahaDBT Farmer Schemes)

 

 

 

अनुदान ?

 

1. मनुष्यचलित टोकन यंत्र (Dibbler) : किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रु.10,000 याप्रमाणे

 

2. पीव्हीसी पाइप (PVC Pipe) : किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रु.15,000 याप्रमाणे

 

3. तेलघाणा (Oil Extraction Unit) : किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रु.180000 याप्रमाणे

 

4. बीज प्रक्रिया ड्रम (Seed Treating Drum) : किंमतीच्या 50 टक्के याप्रमाणे

 

5. मनुष्यचलित सायकलवर चालणारे सिड ड्रील : किंमतीच्या 50 टक्के किंवा उच्चतम रु.5000 याप्रमाणे

 

Mahadbt Token Yantra

 

 

Pvc Pipe Hdpe Pipe Subsidy (1)

 

 

Seed Treating Drum Mahadbtfarmer

 

 

 

Mini Oil mill Extractor

 

 

अशाच नवीन अपटेड मिळविण्याकरिता ग्रुप ला जॉइन व्हा

 

हे पण पहा :

 

* “या” दिवशी मिळणार पीएम किसान योजनेचा 19 वा हफ्ता

* एक रुपयात पीक विमा बंद होणार? समितीची राज्य सरकारला शिफारस

* महाडीबीटी योजना बंद? आता अजित पोर्टल वर शेतकरी योजनांचा लाभ…

* ई पीक पाहणी करायची लक्षात राहिली नाही…. मग आता “हा” आहे शेवटचा पर्याय?

* लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्याचा हफ्ता मिळणार “या” दिवशी?

* आता “हे” केले तरच मिळणार सरकारी योजनांचे अनुदान …

* महावितरण ची लकी डिजिटल ग्राहक योजना… जाणून घ्या सविस्तर माहिती

* आता दुकानात राशन आले की मिळणार माहिती

 

Tags : mahdbt farmer schemes portal, mahadbt yojana, mahadbt shetkari yojana, mahadbt farmer portal, mahadbtfarmer, 

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!