E-Peek Pahani : शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करण्याकरिता राज्यात ई-पीक पाहणी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमा मधून राज्यातील शेतकरी हे आपल्या शेतातील पिकांची सातबारा वरती नोंद करू शकणार आहेत. राज्यात उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता दिनांक ८ एप्रिल २०२६ पासून ई-पीक पाहणी डिजीटल क्रॉप सर्वे (DCS) मोबाईल अॅप द्वारे पीक नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. E-Peek Pahani
दिनांक ८ एप्रिल २०२६ पासून राज्यातील सर्व गावांमध्ये उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ डिजीटल क्रॉप सर्वे द्वारे ई पिक पाहणी सुरु करण्यात आली आहे. या प्रकल्पात शेतकरी स्तरावरून व सहायक स्तरावरून मोबाईल अॅपद्वारे पिकांची नोंद करता येणार आहे. त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे उन्हाळी हंगाम २०२५-२०२६ करिता कालावधी निश्चित करण्यात आलेला आहे. E-Peek Pahani
उन्हाळी हंगाम ई-पीक पाहणी कालावधी
शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी कालावधी :: ८ एप्रिल २०२६ ते २४ मे २०२६
सहायक स्तरावरील ई-पीक पाहणी कालावधी :: २५ मे २०२६ ते ८ जुलै २०२६
डिजिटल क्रॉप सर्वे अंतर्गत १००% ई-पीक पाहणी नोंद करणे बंधनकारक आहे. उन्हाळी हंगामात शेतात उभे असलेले पीक, कायम पड अथवा चालू पड असलेल्या जमिनींची नोंद करणे आवश्यक आहे. तरी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणी न केलेल्या सर्व शेतजमिनींची १००% ई-पीक पाहणी मोबाईल अॅप द्वारे सहायक स्तरावरून पूर्ण करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. E-Peek Pahani
ई पीक पाहणी का करावी?
ई पीक पाहणीची नोंद न केल्यास शेत हे त्यावर्षी पडीक किंवा पेरणी झालीच नाही, असे गृहीत धरण्यात येईल. पुढील हंगामाकरिता कोणत्याही बँकेकडून पीककर्ज घेताना अडचणी निर्माण होतील. प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळणार नाही. यावर्षी ज्या प्रमाणे सोयाबीन कापूस अनुदान देण्यात येत आहे त्याप्रमाणे जर शासनाद्वारे एखाद्या पिकाला आर्थिक मदत जाहीर केली, तर त्यापासूनही वंचित राहावे लागेल. शेतातील पिकांचे वन्य प्राण्यांनी नुकसान केल्यास त्याचीही नुकसान भरपाई मिळू शकणार नाही.
तसेच, ई-पीक पाहणी ही शासनाचे अतिवृष्टी अनुदान, पीक विमा, पीक कर्ज, विविध योजना साठी अत्यंत महत्वाचे आहे. त्यासाठी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे. E-Peek Pahani
ई-पीक पाहणी मुदत?
राज्यामध्ये उन्हाळी हंगाम 2025-26 करिता ई-पीक पाहणी ही दिनांक 08 एप्रिल पासून सुरू झाली आहे. तर शेतकरी हे 24 मे पर्यन्त पीक पाहणी करू शकतील.
कोठे करायची ई-पीक पाहणी नोंद?
प्रथम आपल्याला अद्ययावत ई-पीक पाहणी ॲप हे मोबाइल वरती डाऊनलोड करावे लागणार आहे. त्यानंतर त्यामध्ये नाव, गाव, गट क्रमांक, अशी माहिती टाकून शेतातील पिकांचे फोटो अपलोड करावे लागणार आहे.
अद्ययावत ॲप : येथून डाऊनलोड करा

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
