Farm Road : मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजना सुरु झाली आहे. या योजनेसाठी विधानसभा स्तरावर समित्या तयार करण्यात आल्या. रस्त्याची मोजणी करणे, त्याला क्रमांक देणे आणि त्यानंतर रस्त्याचे बांधकाम करणे. मोजणी झाल्यानंतर झाडे लावून सीमा निश्चित करणे, यामुळे कधीही अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेतली जाईल.
पण शासकीय पाणंद रस्त्यावर अनेक शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे शासनाने निर्णय घेतला आहे की, शासकीय पाणंद रस्ता जर अडवला किंवा त्यावर अतिक्रमण केले तर त्या शेतकऱ्यांचे संपूर्ण फार्मर आयडी बंद करणार आहोत. यामुळे त्यांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही.
शेतरस्ते अडविणाऱ्या किंवा त्यावर अतिक्रमण करणाऱ्या व्यक्तींचे आधार कार्ड आणि ‘फार्मर आयडी’ पाच वर्षांसाठी ब्लॉक करण्यात येणार आहे. अशा व्यक्तींना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना दिला. Farm Road
‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजना प्रभावीपणे राबविण्याबाबत सरकारची भूमिका मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार ही नियमावली तयार करण्यात आली आहे. गाव नकाशावर असलेल्या किंवा शासकीय जमिनीवरील रस्त्यांवर अतिक्रमण आढळल्यास संबंधितांना तहसीलदार सात दिवसांची नोटीस देतील. Farm Road
या मुदतीत अतिक्रमण न काढल्यास शासन स्वतः ते हटवेल आणि संबंधित अतिक्रमणधारकाला पाच वर्षांसाठी सर्व सरकारी लाभांपासून वंचित ठेवले जाईल. महामार्ग किंवा रेल्वे प्रकल्पांमुळे शेतरस्ते (Farm Road) बंद झाले असल्यास ‘राइट ऑफ वे’ अंतर्गत सर्व्हिस रोड उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचा रस्ता मिळवण्याचा हक्क अबाधित ठेवला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?

