MahaDBT Farm Pond List : महाराष्ट्र राज्यात पर्जन्याधारीत शेतीसाठी पाणलोटावर आधारीत जलसंधारणाच्या उपाययोजनांद्वारे पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी यापूर्वी देखील शासनाने शेततळे योजना अनुदानावर राबविलेली आहे. आणि त्यामुळे शेतक-यांचे उत्पादन व उत्पन्नात वाढ होऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत झालेली आहे.
शेतक-यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शेततळे चे खोदकामासाठी येणारा खर्च करणे शक्य होत नाही. सद्यस्थितीत राज्यातील शेतक-यांना शेततळे खोदकामासाठी शासनाची कोणतीही योजना कार्यान्वित नसल्याने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेचा विस्तार करून या योजनेत वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश केलेला आहे. आणि आता महाराष्ट्र राज्यातील सर्व इछुक शेतकर्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची पद्धती ही खालील प्रमाणे आहे, आपण खालील दिलेल्या पद्धतीने अर्ज केला तरच आपली शेततळे साठी निवड होईल त्यामुळे पद्धत व्यवस्थित पहावी आणि अर्ज करावा.
महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करण्याची कार्यपद्धती
स्टेप 1: महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे (mahadbt login)
स्टेप 2: अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 3: सिंचन साधने आणि सुविधा ही बाब निवडावी
स्टेप 4: आपला तालुका, गाव, गट क्रमांक निवडावा
स्टेप 5: अनुदान हवे असलेली बाब निवडावी
वैयक्तिक शेततळे हे निवडावे
स्टेप 6: उपघटक निवडावा
इनलेट आणि आउटलेट सह किंवा इनलेट आणि आउटलेटशिवाय हे निवडावे
स्टेप 7: शेततळ्याचे आकारमान निवडावे
स्टेप 8: शेततळ्याचा स्लोप निवडावा
स्टेप 9: अर्ज जतन करावा
स्टेप 10: मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 11: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 12: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी पोर्टलवर अनुदानित बियाणे वितरण व एक प्रात्यक्षिक बियाणे वितरण साठी अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर केल्यानंतर बियाणे सोडत साठी अर्ज विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला भारताला त्याच्या मोबाईल संदेशवद्वारे सूचित करण्यात येईल.
दिनांक 21 मे रोजी निवड करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची जिल्हानिहाय यादी खालील प्रमाणे आहे.
जिल्हा : अकोला
जिल्हा : अमरावती
जिल्हा : अहमदनगर
जिल्हा : धाराशीव
जिल्हा : छत्रपती संभाजीनगर
जिल्हा : कोल्हापूर
जिल्हा : गडचिरोली
जिल्हा : गोंदिया
जिल्हा : चंद्रपूर
जिल्हा : जळगाव
जिल्हा : जालना
जिल्हा : ठाणे
जिल्हा : धुळे
जिल्हा : नंदुरबार
जिल्हा : नागपूर
जिल्हा : नांदेड
जिल्हा : नाशिक
जिल्हा : परभणी
जिल्हा : पालघर
जिल्हा : पुणे
जिल्हा : बीड
जिल्हा : बुलढाणा
जिल्हा : भंडारा
जिल्हा : यवतमाळ
जिल्हा : रत्नागिरी
जिल्हा : रायगड
जिल्हा : लातूर
जिल्हा : वर्धा
जिल्हा : वाशिम
जिल्हा : सांगली
जिल्हा : सातारा
जिल्हा : सिंधुदुर्ग
जिल्हा : सोलापूर
जिल्हा : हिंगोली