Posted in

MahaDBT Farmer List : कृषि यांत्रिकीकरणाची नवीन सोडत यादी आली | 01 ऑगस्ट 2025 लॉटरी लिस्ट पहा

Mahadbt farmer list कृषि यांत्रिकीकरणाची नवीन सोडत यादी आली 01 ऑगस्ट 2025 लॉटरी लिस्ट पहा (1)
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.8/5 - (6 votes)

MahaDBT Farmer Listt : महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल (Mechanization Lottery List) द्वारे कृषि विभागाकडून कृषी यांत्रिकीकरण घटक साठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातात. आणि या ऑनलाइन प्राप्त अर्जामधून महाडीबीटी पोर्टल द्वारे सोडत काढली जाते. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, इत्यादि अनेक कृषि औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात येते.

 

तर, दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण घटकाची सोडत यादी काढण्यात आलेली आहे. तर या यादीमध्ये ज्या शेतकर्‍यांची निवड झाली आहे त्यांनी आवश्यक कागदपत्रे पोर्टल वरती अपलोड करून घ्यावे. MahaDBT Farmer List

 

महाडीबीटी सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे लागते आणि त्यानंतर पूर्वसंमती आणि पुढे अनुदान रक्कम अदा करणे असे टप्पे महाडीबीटी मध्ये आहेत. (MahaDBT Farmer List)

 

 

दिनांक 01 ऑगस्ट 2025 रोजी कृषि यांत्रिकीकरणाची सोडत काढण्यात आली आहे. या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक अपलोड करावे.(MahaDBT Farmer List)

 

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य) MahaDBT Farmer List

 

 

MahaDBT Farmer List

 

दिनांक 01 ऑगस्ट 2025 च्या कृषि यांत्रिकीकरण सोडत मध्ये खालील प्रमाणे जिल्हा निहाय शेतकरी यांची निवड झालेली आहे. 

 

जिल्हानिवड झालेली शेतकरी संख्या
बुलढाणा1465
सोलापूर866
लातूर818
अहिल्यानगर796
जळगाव620
सांगली609
नाशिक458
परभणी455
जालना385
सिंधुदुर्ग324
धुळे317
यवतमाळ314
भंडारा290
पुणे269
नांदेड262
सातारा233
चंद्रपूर226
गोंदिया216
हिंगोली152
वर्धा151
धाराशिव127
बीड89
कोल्हापूर85
नागपूर84
छत्रपती संभाजीनगर54
पालघर50
रायगड42
ठाणे39
नंदुरबार35
अमरावती25
वाशिम21
अकोला17
रत्नागिरी12
गडचिरोली1

 

आपल्या जिल्ह्याची सोडत यादी पाहण्यासाठी किंवा डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या. 

 

जिल्हा निहाय सोडत यादी : येथे डाऊनलोड करा

 

error: Content is protected !!