Mahadbt farmer login महाडीबीटी फार्मर पोर्टल – शेतकरी योजना
महाडीबीटी फार्मर पोर्टल – शेतकरी योजना : एक शेतकरी एक अर्ज Mahadbt farmer login
कृषि विभागाच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर यापूर्वी आपण तालुक्याच्या तालुका कृषि अधिकारी कार्यालयात जाऊन ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करत होतो आणि या मध्ये समजा एखाद्या शेतकर्याला एका पेक्षा अधिक घटकासाठी जसे की तुषार संच, ठिबक सिंचन, रोटावेटर, ट्रॅक्टर व इतर यंत्रे, इत्यादि बाबींचा अर्ज करायचा असेल तर त्यासाठी त्या शेतकर्याला प्रत्येक घटकासाठी वेग वेगळा अर्ज आणि त्यासोबत कागदपत्रे जसे की सातबारा, होल्डिंग, आधार कार्ड, बँक खाते पासबूक इत्यादि कागदपत्रे ही त्या कृषि कार्यालयात जमा Mahadbt farmer login करावी लागत होती.
परंतु, आता शेतकरी बांधवानो आता कृषि विभाग, महाराष्ट्र शासन krishivibhag maharashtra यांनी आता शेतकर्यांना कृषि विभागातील कोणत्याही योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कोणत्याही तालुक्याच्या किंवा जिल्ह्याच्या कृषि कार्यालयात जाण्याची गरज नाहीये, किंवा योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणतेही कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज ठेवली नाहीये तसेच वेग वेगळ्या घटक किंवा बाबींसाठी वेग वेगळे अर्ज करण्याची सुद्धा पद्धत ठेवली नाही तर आता ऑनलाइन पद्धतीने एकाच पोर्टल द्वारे आणि एकाच अर्ज मध्ये शेतकरी हे लाभ घ्यावयाच्या बाबी / घटक नोंदवून अर्ज सादर करू शकतात, यासाठी कृषि विभाग, महाराष्ट्र शासनाने महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना Mahadbt farmer login हे पोर्टल तयार केले आहे.
आता ज्या शेतकरी बांधवांना कृषि विभागातील विविध योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी आपल्या गावातील सेवा सुविधा केंद्र किंवा कम्प्युटर सेंटर ला भेट देऊन महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना या पोर्टल म्हणजे संकेतस्थळावर जाऊन हव्या असलेल्या घटकासाठी अर्ज करू शकतात.
“महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना” पोर्टल प्रकिया
महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना Mahadbt farmer login या पोर्टल च्या संकेतस्थळावर वर अर्ज केल्यानंतर कृषि विभाग, महाराष्ट्र krishivibhag maharashtra हे सोडत यादी जाहीर करते म्हणजेच लॉटरी यादी ही प्रसिद्ध केली जाते तसेच ज्या शेतकरी बांधवांची लॉटरी मध्ये निवड झाली आहे त्यांना त्यांच्या पोर्टल वर नोंदनिकृत मोबाइल वरती निवड झाल्या बाबतचा संदेश देखील पाठविला जातो. निवड झाल्यानंतर शेतकर्यांना निवड झालेल्या घटकासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे ही महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना ह्या पोर्टल संकेतस्थळावर वरती उपलोड करावी लागतात. आवश्यक कागदपत्रे ही अपलोड केल्यानंतर त्या कागदपत्रांची कृषि विभाग, महाराष्ट्र हे पोर्टल वर ऑनलाइन पद्धतीने छाननी करते आणि कागदपत्रे योग्य असल्यास त्या निवड झालेल्या लाभार्थ्यास निवड झालेला घटक म्हणजेच यंत्र औजारे खरेदी करण्यासाठी पुर्वसंमती देण्यात येते.
एकदा पूर्वसंमती प्राप्त झाली की नंतर लाभार्थ्याला ज्या घटकासाठी निवड झाली आहे तो घटक खरेदी करून अनुदान मागणी करिता त्या घटकाचे बिल किंवा इनवॉइस हे महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना या पोर्टल संकेतस्थळावर वर अपलोड करावे लागते. त्यानंतर, परत अपलोड केलेल्या बिल किंवा इनवॉइस आणि निवड झालेल्या घटक नुसार लाभार्थ्याने खरेदी केलेल्या घटका ची कृषि विभाग हे जायमोक्यावर जाऊन पाहणी करते म्हणजेच मोका तपासणी करण्यात येते आणि त्यानंतर सर्व व्यवस्थित असेल तर लाभार्थ्यास त्यांच्या महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी केलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान अदा केले जाते.
तर अशा प्रकारे महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना पोर्टल वरती प्रक्रिया केली जाते.
महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना योजना पोर्टल कागदपत्रे अपलोड करण्याचा कालावधी
महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना Mahadbt farmer login पोर्टल द्वारे लाभार्थ्यांची निवड झाल्यानंतर निवड झाल्याचा संदेश हा त्या अर्जदाराच्या पोर्टल वरील नोंदनिकृत मोबाइल वर दिला जाणार आहे. लाभार्थ्यांची निवड झाल्यापासून ०७ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्यांला महाडीबीटी फार्मर पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल. तसेच, दिलेला कालावधी झाल्यानंतर परत ज्या शेतकर्यांचे कागदपत्रे अपलोड करावयाचे राहिले असतील त्यांना त्यांच्या नोंदनिकृत मोबाइल वरती संदेश पाठवून परत ०३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येते. आणि या देण्यात आलेल्या मुदतीमध्ये जे शेतकरी कागदपत्रे ही अपलोड करण्यास असमर्थ ठरतील त्यांचे अर्ज सिस्टीम द्वारे आपोआप रद्द केले जातील. म्हणजेच, एकंदरीत निवड झाल्यापासून १० दिवसांमध्ये संबंधित शेतकर्यांना महाडीबीटी फार्मर पोर्टल वर आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे बंधनकारक असेल.
महाडीबीटी फार्मर – शेतकरी योजना योजना पोर्टल बिल/देयके अपलोड करण्याचा कालावधी
पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्याला बिल सादर करण्याकरिता २५ दिवसांची मुदत दिली जाते आणि या मुदतीमध्ये बिल पोर्टल वर सादर न केल्यास नोंदनिकृत मोबाइल वरती एक संदेश पाठवून परत ०५ दिवसांची वाढीव मुदत देण्यात येते आणि या मुदतीमध्ये शेतकरी बिल अपलोड करण्यास असमर्थ ठरल्यास सिस्टीम द्वारे पूर्वसंमती रद्द केली जाते. म्हणजेच एकंदरीत एकूण ३० दिवसांमध्ये निवड झालेला घटक खरेदी करून पोर्टल Mahadbt farmer login वर बिल अपलोड करणे बंधनकारक असेल.
तर शेतकरी बांधवानो महाडीबीटी फार्मर पोर्टल वर आपण अद्याप अर्ज केले नसतील तर आपल्या गावातील किंवा जवळील सीएससी केंद्र वरती भेट देऊन आपण महाडीबीटी फार्मर पोर्टल वर अर्ज सादर करू शकता.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल लॉगिन New Applicant Registration
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला प्रथमता महाडीबीटी पोर्टल वर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी खालील लिंक किंवा संकेतस्थळावर जाऊन आधार क्रमांक व त्याद्वारे पाठविण्यात आलेला ओटीपी सादर करून पोर्टल वर नोंदणी करावी.
नवीन अर्जदार नोंदणी येथे करा : नोंदणी करा
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल लॉगिन Applicant Login Here
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर अर्ज करण्यासाठी लाभार्थ्याला खाली दिलेल्या लिंक वरती किंवा संकेतस्थळावरती जाऊन आपला आधार क्रमांक किंवा यूजरनेम आणि पासवर्ड सादर करून लॉगिन करावे.
पोर्टल लॉगिन Applicant Login Here
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल अर्ज करा Application Apply Here
ज्या शेतकर्यांना महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल Mahadbt farmer login वर कृषि विभागाच्या विविध योजना साठी अर्ज करावयाचा आहे त्यांनी पोर्टल वर लॉगिन करावे आणि नंतर अर्ज करा हा पर्याय निवडून त्यामध्ये ज्या ज्या घटकांसाठी अर्ज करावयाचा आहे ते सर्व घटक निवडावेत आणि अर्ज सादर करावा.
महाडीबीटी शेतकरी योजना सोडत यादी / लॉटरी यादी
महाडीबीटी पोर्टल द्वारे दर दहा दिवसांनी सोडत यादी काढली जाते. निवड झाल्यानंतर निवड झाल्याचा संदेश हा त्या अर्जदाराच्या पोर्टल वरील नोंदनिकृत मोबाइल वरती पाठविला जातो. आपल्याला संदेश प्राप्त होत नसेल तर आपण पोर्टल वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या Mahadbt farmer login महाडीबीटी लॉटरी यादी पाहू शकता.
महाडीबीटी लॉटरी यादी पहाण्यासाठी या साइट वरती जावे : येथे भेट द्या