sharad pawar gram samridhi yojana 2023 registration शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023
शरद पवार ग्राम समृद्धि योजना 2023
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 :- महाराष्ट्र शासनाने सुरू करण्यात आलेल्या ग्राम समृद्धी योजना sharad pawar gram samridhi yojana 2023 registration ही राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. शरद पवार यांच्या 80 व्या वाढदिवसा निमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाची शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे मुख्य उद्दिष्ट हे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे आणि महाराष्ट्रातील सर्व ग्रामीण भागातील सर्वांची आर्थिक स्थिती सुधारणे हे आहे. योजनेचा उद्देश असा आहे की जेणेकरून ग्रामीण भागात राहणार्या शेतकरी व गावातील मजुरांना त्यांच्याच कार्य क्षेत्रात रोजगार मिळावा. तसेच, ही योजना शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा – मनरेगा) अंतर्गत जोडली जाणार आहे. योजनेंतर्गत जी काही कामे अकुशल कामे होतील ती ग्रामीण रोजगार विभागाकडून मजुरांच्या सहाय्याने केली जाणार आहेत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2023 काय आहे?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना ही सुरू झाल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर हे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार असून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे. या सोबतच या योजने अंतर्गत इतर अनेक योजना राबविल्या जाणार आहेत.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
शरद पवार ग्राम समृद्धी योजने साठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांना काही महत्त्वाच्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे ते कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :
- आधार कार्ड Aadhar
- मतदार कार्ड Voter Id
- उत्पन्न प्रमाणपत्र Income Certificate
- रेशन कार्ड / शिधापत्रिका Ration Card
- पासपोर्ट फोटो
sharad pawar gram samridhi yojana 2023 registration
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी लागणारी पात्रता
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदारांना काही आवश्यक पात्रता पूर्ण करणे बंधनकारक आहे. शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत लाभ किंवा अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे पात्रता असने आवश्यक आहे :
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकरी असणे बंधनकारक आहे
केवळ ग्रामीण भागात राहणारेच अर्ज करण्यासाठी पात्र असतील.
अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्याचा असावा.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची वैशिष्ट्ये
12 डिसेंबर 2020 रोजी ही योजना शरद पवार यांच्या ऐंशीव्या वाढदिवसानिमित्त सुरू करण्यात आली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा गौरव म्हणून या योजनेचे नाव देण्यात आलेले आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक परीस्थिती सुधारण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचे फायदे
योजनेचा लाभ हा महाराष्ट्रातील सर्व पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.
या योजने अंतर्गत गायी, शेळ्या, मेंढ्यां साठी गोठा आणि शेड बांधण्यात येणार आहेत.
या योजनेंतर्गत जर तुम्हाला पोल्ट्री फार्म/कुक्कुट पालन करायचे असेल तर योजने अंतर्गत आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिति ही सुधारली जाणार आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत ग्रामीण भागात राहणाऱ्या मजुरांना रोजगार दिला जाणार आहे. जेणेकरून त्यांना रोजगाराचे साधन उपलब्ध होऊन उत्पन्नात वाढ होऊ शकेल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी अर्जदारांना ऑनलाइन/ऑफलाइन ग्रामपंचायत द्वारे पंचायत समिति ला अर्ज करावा लागेल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा उद्देश काय?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत गावातील शेतकर्यांना गायी, शेळी मेंढया, यांच्यासाठी गोठा किंवा शेड बांधण्याकरिता अर्थ सहाय्य देणे. तसेच, शेतकर्यांना जोड धंद्या कडे वळावे यासाठी कुकुट पालन करिता देखील या योजने अंतर्गत मदत दिली जाणार आहे. तसेच, गावातील मजुरांना गावा मध्येच रोजगार उपलब्ध व्हावा या करिता ही योजना सुरू करण्यात आली आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत घटक तपशील?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत खालील घटक राबविले जाणार आहेत :
गायी म्हसी यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे यासाठी 77,188/ रुपये इतका खर्च येईल
शेळीपालन शेड बांधणे करिता 49284/- इतका खर्च येईल
कुकुट पालन शेड बांधणे करिता 49760/- इतका खर्च येईल.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेची ऑनलाइन नोंदणी कशी करावी?
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला सद्यपरिस्थिति नुसार तर ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध झालेला नाहीये त्यामुळे आपण आपल्या ग्रामपंचायत द्वारे पंचायत समिति कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. ऑनलाइन अर्ज उपलब्ध झाले तर खालील प्रमाणे अर्ज सादर करू शकता :
- शरद पवार ग्राम समृद्धी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देतात.
- त्यानंतर तुमच्या समोरील स्क्रीनवर वेबसाइटचे मुख्य पृष्ट असेल.
- तुम्हाला मुख्यपृष्ठावर शरद पवार ग्राम समृद्धी योजना ऑनलाईन अर्ज या लिंकवर क्लिक करा.
- पुढे तुम्हाला स्वतःची नोंदणी करा व तुम्हाला फॉर्ममध्ये इतर काही महत्त्वाची माहिती द्यावी लागेल.
- पुढे, सबमिट बटन वरती क्लिक करून अर्ज सादर करावा.
FAQ :
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेशी संबंधित अधिकृत संकेतस्थळ कोणते आहे?
सद्यपरिस्थिति नुसार तर ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध झालेला नाहीये त्यामुळे आपण आपल्या ग्रामपंचायत द्वारे पंचायत समिति कार्यालयात ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता
योजनेत अर्ज करण्याची पात्रता काय असावी?
अर्जदार हा शेतकरी असावा आणि त्या कडे रोजगार हमी योजना अंतर्गत जॉब कार्ड असणे आवश्यक आहे.
ग्रामीण भागात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ही योजना कशी फायदेशीर ठरू शकते?
शरद पवार ग्राम समृद्धी योजना अंतर्गत खालील घटक राबविले जाणार आहेत :
गायी म्हसी यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे यासाठी 77,188/ रुपये इतका खर्च येईल
शेळीपालन शेड बांधणे करिता 49284/- इतका खर्च येईल
कुकुट पालन शेड बांधणे करिता 49760/- इतका खर्च येईल.
तसेच, या सोबत लाभार्थी हा वैयक्तिक शेततळे, वृक्षलागवड, या बाबींचा देखील लाभ घेऊ शकतो.