Nano Urea DAP : नॅनो युरिया डीएपी, बॅटरी संचलित फवारणी पंप साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत | महाडीबीटी शेतकरी योजना
Nano Urea DAP : शेतकरी बांधवांना अनुदांनावरती नॅनो युरिया डीएपी, बॅटरी संचलित फवारणी पंप वितरण करण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारणे सुरू आहे. यामध्ये शेतकर्यांना निवड झाल्यानंतर नॅनो युरिया डीएपी, मेटल्डिहाइड हे खते औषधे वितरण करण्यात येणार आहे.
तर, ज्या शेतकरी बांधवांना नॅनो युरिया डीएपी, मेटल्डिहाइड (Nano Urea, Nano DAP, Metaldehyde insecticide) ही खते/औषधे तसेच बॅटरी संचलित फवारणी पंप हवी आहेत त्या इच्छुक शेतकरी बांधवांनी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वर खते औषधे या बाबी अंतर्गत दिनांक 12/07/2024 पर्यन्त ऑनलाइन अर्ज सादर करावेत असे आवाहन कृषि विभागाकडून करण्यात आले आहे.
ऑनलाइन अर्ज : महाडीबीटी पोर्टल
खते/औषधे : नॅनो युरिया डीएपी, मेटल्डिहाइड
कृषि यंत्र : बॅटरी संचलित फवारणी पंप
अंतिम मुदत : 12/07/2024