PoCRA 2.0 Update : पोक्रा प्रकल्प टप्पा-2 अमलबजावणी सुरू….
PoCRA 2.0 Update : जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. या प्रकल्पात राज्यातील एकूण २१ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, परभणी, धाराशीव, लातूर, नांदेड, हिंगोली तर विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली तसेच खानदेशातील जळगाव व नाशिक अशा एकूण २१ जिल्ह्यांमध्ये अंदाजित 6000 कोटी रुपयांच्या नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा टप्पा-२ राबविण्यात येणार आहे. (Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Prakalp PoCRA 2.0 Update)
प्रकल्पाच्या टप्पा दोनमध्ये (PoCRA 2.0) समाविष्ट करण्यासाठी गावांसाठीचे निकष निर्धारित करुन त्यानुसार गावांच्या निवडीबाबतची प्रक्रिया पूर्ण करुन निवड केलेल्या एकूण 6959 गावांच्या यादीस मान्यता देण्यात आली आहे.
तर या २१ जिल्ह्यातील गावांच्या निवडीस शासन निर्णय अन्वये मान्यता मिळालेली आहे. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी सद्यस्थितीत कार्यरत असलेल्या अधिकारी/ कर्मचारी (विभागीय कृषि सहसंचालक, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, प्रकल्प संचालक (आत्मा), उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहाय्यक) यांचेमार्फत करावयाची आहे. (PoCRA 2.0 Update)
PoCRA 2.0 Update पोक्रा प्रकल्प टप्पा-2 :
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात, शेतीविषयक नवीन संशोधनाचा उन्नत शेतीसाठी उपयोग, पाण्याचा कार्यक्षम वापर वाढविण्यासाठी उपाययोजना करणे व त्यायोगे शेतीमधील कर्ब उत्सर्जन कमी करणे, शेतीमध्ये कर्बग्रहण वाढविणे, संवर्धित पुनरुज्जीवित शोती या हवांमान शेती पद्धतीचा वापर करून पिकांची उत्पादकता वाढविणे, पौष्टिक लुणधान्य उत्पादनावर भर देणे, हवामान अनुकूल तंत्रज्ञानासाठी विविध संशोधन संस्थांबरोबर भागीदारी करणे या महत्त्वाच्या बाबी प्रकल्पातून राबविण्याच्या आहेत.
दुसर्या टप्प्यातील गावांची जिल्हा निहाय यादी
पोक्रा 2.0 गावे यादी : 14-10-2024 शासन निर्णय
Tags : pocra, dbt pocra, pocra dbt, pocra – nanaji deshmukh krushi sanjivani prakalp, pocra 2.0 update, pocra 2.0 village list, pocra village list,
* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..
* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू
* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत
* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती
* जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू…… असे चेक करा आपले पेमेंट स्टेटस
* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?
* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान