Posted in

Gram Crop Advisory : हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन

Gram Crop Advisory (1)
5/5 - (1 vote)

Gram Crop Advisory : चालू वर्षी हरभरा पिकाचा पेरा वाढल्याचे दिसत आहे तर आता हरभरा पिकावर काही ठिकाणी किडींचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून येत आहे अशा वेळी किडींचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक असते त्यासाठी आपण कोणती फवारणी घ्यावी यासाठी कृषि विद्यापीठाचा हा संदेश पाहणार आहोत. 

 

 

सध्याच्या परिस्थितीत हरभ-यावर घाटेअळी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्याकरिता खालील प्रमाणे किडींचे व्यवस्थापन करावे.

 

घाटेअळी करीता : (Gram Crop Advisory)

 

1. शेतामध्ये इंग्रजी ” T ” आकाराचे प्रति एकरी २० पक्षी थांबे लावावेत.

 

2. घाटेअळीच्या सर्वेक्षणासाठी प्रति एकरी २ कामगंध सापळे लावावेत

 

3. हरभरा पीक फुलोरा अवस्थेत असतांना ५% निंबोळी अर्काची किंवा ३०० पीपीएम अझाडीरेकटीन ५० मिली प्रति १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी घ्यावी. अळी अवस्था लहान असताना एच.ए.एन.पी.व्ही ५०० एल.ई. विषाणूची १० मिली प्रति १० लिटर पाणी (२०० मिली प्रति एकर) याप्रमाणे फवारणी करावी.

 

 

किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतर : 

 

इमामेक्टिन बेंझोएट ५ % – ४.५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ८८ ग्रॅम)

किंवा

क्लोरॅट्रानिलीप्रोल १८.५ % – ३ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर ६० मिली)

किंवा

फ्लुबेंडामाईड २० % – ५ ग्रॅम प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे (प्रती एकर १२५ ग्रॅम) फवारावे.

 

 

अधिक माहितीसाठी संपर्क करा

 

कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ
परभणी
☎ ०२४५२-२२९००० कृषि माहिती वाहिनी
📱 ८३२९४३२०९७ व्हॉट्सऍप हेल्पलाईन

 

 

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप/सौर पंप साठी अर्ज चालू झाले आहेत का?… मित्रांनो, काय आहे सत्यता…..

* 16 डिसेंबर पासून राज्यात “अग्रिस्टॅक” योजना होणार सुरू

* हरभरा, गहू, कांदा विम्या साठी 15 डिसेंबर पर्यन्त मुदत

* आता व्हॉट्सॲप वर मिळवा पीक विमा स्टेटस, पीक नुकसान सूचना सद्यस्थिती

* जुलै ते सप्टेंबर 2024 अतिवृष्टी मदत वाटप सुरू…… असे चेक करा आपले पेमेंट स्टेटस

* मागेल त्याला सौर कृषी पंप पेमेंट ऑप्शन आले | असे करा चेक?

* महाडीबीटी तुषार संच साठी अर्ज सुरू | मिळणार 80% अनुदान

* रब्बी हंगाम पीक विमा अर्ज भरण्यास सुरुवात | “ही” आहेत आवश्यक कागदपत्रे

* खरीप हंगाम 2024 – “या” जिल्हयांची सुधारित पैसेवारी जाहीर

* रेशन कार्ड ई-केवायसी करिता मुदत वाढ | आता या तारखे पर्यन्त करता येणार केवायसी

* “या” दिवशी मिळणार पुढील लाभ | लवकरच …डिसेंबर महिन्याचे पैसे मिळणार

error: Content is protected !!