Posted in

Rainfall Forecast : यंदा कसा असेल पाऊस काळ? | हवामान विभागाचा पहिला अंदाज जाहीर 

Rainfall forecast
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Rainfall Forecast : यंदा माॅन्सून काळात देशात कमी पावसाचा अंदाज आहे. माॅन्सून काळात एल निनो स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी देशात सरासरीच्या 92 टक्के पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. 

 

यंदाच्या माॅन्सून हंगामावर एल निनोचे सावट असल्याने हवामान विभागाच्या अंदाजाकडे सर्वांचे लक्ष होते. तर आता हवामान विभागाने दिनांक 13 एप्रिल रोजी माॅन्सून हंगाम २०२६ मधील, जून ते सप्टेंबर या कालावधीतील पहिला अंदाज जाहीर केला. या अंदाजात देशभरातील पर्जन्यमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशभरातील पाऊस सरासीरच्या ९२ टक्के राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Rainfall Forecast

 

यात ५ टक्क्यांची वाढ किंवा घट गृहीत धरण्यात आलीआहे. वातावरणीय वारंवारीतेचा विचार करता तुटीचा पाऊस अर्थात ९० टक्क्यापेक्षा कमी पावसाचा ३५ टक्के अंदाज आहे. तर सरासरीपेक्षा कमी म्हणजेच ९० ते ९५ टक्के पावसाचा ३१ टक्के अंदाज आहे. याचाच अर्थ असा की सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता ६६ टक्के आहे. सरासरी पावसाची शक्यता केवळ २७ टक्के आहे. Rainfall Forecast

 

प्रशांत महासागरात सध्या कमकुवत ला नीना स्थिती असून ही स्थिती एन्सो-तटस्थ स्थितीकडे संक्रमण करत आहे. एन्सो स्थिती एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. तर माॅन्सून हंगामात एल निनो स्थिती विकसित होण्याची शक्यता आहे. 

 

सध्या भारतीय महासागरात इंडियन ओशन डायपोल अर्थात आयओडी तटस्थ स्थितीत आहे. माॅन्सून हंगामाच्या शेवटी आयओडी सकारात्मक स्थितीत येऊ शकतो, असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे.  Rainfall Forecast

 

मागील तीन महिन्यांत, जानेवारी ते मार्च या काळात उत्तर गोलार्धातील हिमआच्छादन सामान्यापेक्षा कमी झाले. तर उत्तर गोलार्ध तसेच युरेशियातील हिवाळा व वसंत ऋतूतील हिमआच्छादनाचे प्रमाण आणि देशातील नैऋत्य माॅन्सून हंगामातील पाऊस यांच्यात परस्पर विरोधी संबंध असतो. त्यामुळे या भागातील हिमआच्छादन कमी झाल्यामुळे देशात माॅन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.  Rainfall Forecast

 

राज्यात कसा असेल पाऊस?

महाराष्ट्र राज्यातील बहुतांश भागात माॅन्सून हंगाम २०२६ मध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे. तर पूर्व विदर्भात काही भागात सरासरी पाऊस पडू शकतो, असे संकेत हवामान विभागाच्या अंदाजातून मिळत आहेत. 

 

हे पण पहा :

* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्‍यांसाठी आनंदाची बातमी 

* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?

* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?

* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी

* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार

* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता 

* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

error: Content is protected !!