Soybean Crop Management : सोयाबीन पिकातील पहिली फवारणी कोणती घ्यावी? कीटकनाशक, बुरशिनाशक … पहा सविस्तर
Soybean Crop Management : नमस्कार शेतकरी बांधवानो सोयाबीन पिकामध्ये आता पहिली फवारणी कोणती घ्यावी असा प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना पडला असेल त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी माहिती देत आहोत.
तर, शेतकरी बांधवानो सोयाबीन पिकामध्ये पहिली फवारणी ही 25 ते 35 दिवसांच्या आत होणे आवश्यक आहे. पहिल्या फवारणी च्या वेळेस सोयाबीन मध्ये प्रामुख्याने चक्री भुंगा, उंट आळी, खोड माशी या कीड आढळत असतात. Soybean Crop Management
तर, आपण चक्री भुंगा, उंट आळी, खोड माशी या कीड नियंत्रण करिता या ठिकाणी खालील प्रमाणे फवारणी घेऊ शकता.
1. थायामेथोक्सम १२.६% लॅम्बडा सायहॅलोथ्रीन ९.५% झेडसी (अलिका) 2.5 मिलि/10 लिटर पाणी
किंवा
2. प्रोफेनोफोस 40% + सायपरमेथ्रिन 4% EC (प्रोफेक्स सुपर, पॉलीट्रिन-सी) 20 मिलि/10 लिटर पाणी
किंवा
3. प्रोफेनोफोस 50 इ.सी ( प्रोफेण, प्रोफोस) 20 मिलि/10 लिटर पाणी
किंवा
4. एमॅमेक्टिन बेंझोएट 1.9% E.C (टेग सुपर, एलेंट्रा) 8 मिलि/10 लिटर पाणी
यासोबत एक बुरशिनाशक : रोको किंवा साफ किवा हारू किंवा स्वाधीन हे देखील आपण कीटकनाशका सोबत फवारणी करावे ( 20 ग्राम/10 लिटर पाणी)
सूचना : वरील प्रमाण हे साध्या पंप साठी आहे. पेट्रोल पंप साठी हेच प्रमाण तिप्पट करावे.