Soybean Top Varieties: सोयाबीन पिकाचे सर्वाधिक उत्पादन देणारे 10 वाण | ह्या आहेत सोयाबीन च्या टॉप 10 जाती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Soybean Top Varieties: महाराष्ट्र मध्ये सोयाबीन या पिकाचा खरीप मध्ये सर्वाधिक जास्त पेरा असतो. आणि आता खरीप हंगाम मध्ये बरेच शेतकरी बांधव हे कोणते वाण पेरणी करावे या विचारात असतात. तर, शेतकरी बांधवानो खलील दिलेले हे वाण सर्वाधिक उत्पादन देणारे वाण आहेत. तर, आपण खालील दिलेल्या वाणा पैकी पेरणी साठी निवड करू शकता.

 

Soybean Top Varieties

 

एम.ए.यू.एस. – 612

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथून 2018 मध्ये प्रसारित झालेले हे वाण आहे. पिकाचा कालावधी हा 93 ते 98 दिवसांचा आहे.  हे वाण 98 दिवसांत परिपक्व होणारे, अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण, उंच वाढ, तसेच वातावरण बदलामध्ये तग धरून उत्पादन देणारे वाण आहे. (Soybean Top Varieties) सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 30 ते 35 क्विंटल मिळू शकते. दुष्काळसदृश परिस्थिती व आंतरपीक पद्धतीत अतिशय योग्य असे वाण.

 

के डी एस – 726 (फुले संगम)

फुले संगम हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 2016 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या भागाकरिता शिफारशीत करण्यात आलेला हा सोयाबीनचा वाण आहे. फुले संगम हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडणारा वाण म्हणून शिफारशीत असून या वाणाचा परिपक्वता कालावधी 100 ते 105 दिवस आहे. (Soybean Top Varieties) हा वाण पानावरील ठिपके आणि खोडमाशी सुद्धा तुलनात्मक दृष्ट्या प्रतिकारक असून या वाणाची हेक्टरी उत्पादकता 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी नमूद केली आहे.

 

 

के.डी.एस. 753 (फुले किमया)

महात्मा फुले कृषी विद्यापीठाने हा वाण सन 2017 ला दक्षिण महाराष्ट्र, तेलंगाना, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व इतर काही राज्याकरिता शिफारशीत केला होता. फुले किमया या वाणाचा परिपक्वता कालावधी 95 ते 100 दिवस असून हा वाण तांबेरा रोगास कमी बळी पडतो म्हणून शिफारशीत आहे. या वाणाची हेक्टरी उत्पादकता ही 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे.

 

 

 

के.डी.एस.- 992 (फुले दुर्वा)

फुले दुर्वा  हे वाण नुकतेच 2021 मध्ये प्रसारित झालेले असून, दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत लागवडीसाठी शिफारसीत आहे. फुले दुर्वा हे मध्यम कालवधीत येणारे वाण असून 95 ते 100 दिवसांत  परिपक्व होते. योग्य व्यवस्थापन केल्यास या वणाचे  हेक्टरी सरासरी 27 ते 35 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते. (Soybean Top Varieties)

ए.एम.एस.-100-39 (पी.के. व्ही.अंबा)

डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला द्वारे 2021 मध्ये प्रसारित करण्यात आलेले, 95 ते 97 दिवसांत परिपक्व होणारे, मध्यम जमीनीत अतिशय चांगले उत्पादन देणारे वाण. योग्य व्यवस्थापन केल्यास या वणाचे  हेक्टरी सरासरी 28 ते 30 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळू शकते.

 

 

एम.ए.सी.एस – 1188

सन 2013 मध्ये हे वाण प्रसारित करण्यात आले होते.  100 दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण, सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी 30-32 क्विंटल आहे. हे वाण ओलीताखालील लागवडीस योग्य आहे. (Soybean Top Varieties)

 

एम ए यु एस – 162

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी हा सोयाबीनचा जांभळी फुले असणारा हा वाण 41 ते 44 दिवसात फुलावर येतो तर 100-105 दिवसात परिपक्व होतो. या वाणाची हेक्टरी उत्पादकता 28 ते 30 क्विंटल प्रति हेक्‍टर एवढी आहे. या वाणाची विशेषतः म्हणजे शेंगा झाडाला जमिनीपासून तुलनात्मक दृष्ट्या अधिक उंचीवर लागत असल्यामुळे हा वाण यंत्राद्वारे काढणीसाठी म्हणजेच मशीन द्वारे कापणी साठी उत्तम आहे. तसेच या वाणाच्या शेंगा परिपक्वते नंतर दहा ते बारा दिवस फुटत नाहीत.

 

 

एम. ए.यु.एस. – 71 (समृद्धी)

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून 2002 साली प्रसारित झालेले, 95 ते 100 दिवसांत परिपक्व होणारे, चांगले उत्पादन देणारे वाण,  मध्यम ते भारी जमीनीत लागवडी साठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी 30 ते 32 क्विंटल आहे.

 

 

एम. ए.यु.एस. – 158

 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथून 2009 साली प्रसारित झालेले, 93 ते 98 दिवसांत परिपक्व होणारे, हलक्या व मध्यम जमीनीत लागवडीसाठी योग्य. सरासरी उत्पादन प्रती हेक्टरी 26 ते 31 क्विंटल. (Soybean Top Varieties)

 

 

जे. एस – 335 (जवाहर)

महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असलेला हा वाण आहे. 1994 मध्ये प्रसारित झालेले अतिशय लोकप्रिय असे वाण आहे.  हा वाण 95-100 दिवसांत परिपक्व होते. हा वाण मध्यम ते भारी जमिनीत लागवडीसाठी योग्य आहे. सरासरी उत्पादन प्रति हेक्टरी 25 ते 28 क्विंटल मिळू शकते.

 

तर, ह्या आहेत सोयाबीन पिकच्या सर्वाधिक उत्पादन देणार्‍या व्हरायटीज. (Soybean Top Varieties)

 

अधिक वाचा :

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

* बियाणे खरेदी करताय..तर मग हे पहा

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

WhatsApp चॅनल जॉइन व्हा
error: Content is protected !!