Liquid Bio-fertilizers: कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध | पहा द्रवरूप जिवाणू खते वापरण्याच्या पध्दती VNMKV Parbhani

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Liquid Bio-fertilizers: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ मधील मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभागांतर्गत अखिल भारतीय मृद जैव विविधता-जैविक खत प्रकल्पामध्ये विविध पिकांसाठी द्रवरूप जिवाणू खते (Liquid Bio-fertilizers) ही दिनांक 18 मे पासून विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत, ह्या द्रवरूप जिवाणू खताचे दर रु. 375/- प्रति लिटर असुन यात रायझोबीयम, अझोटोबक्टर, स्फुरद विरघळवीणारे जिवाणू खत (पीएसबी), पालाश विरघळवीणारे जिवाणू खत, गंधक विघटन करणारे व जस्त उपलब्धता वाढविणारे जिवाणू खत, रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) व अझोटोफॉस (अझोटोबक्टर, व पीएसबी मिश्रण) आदींचा यामध्ये समावेश आहे.

 

Liquid Bio-fertilizer
Liquid Bio-fertilizers

 

 

पिकांना दिलेल्या रासायनिक खतांचा कार्यक्षमरीत्या वापर होण्यास जिवाणू खतांमुळे (Liquid Bio-fertilizers)  मदत होते. त्यात रायझोबीयम या नत्र स्थिर करणाऱ्या जीवाणूमुळे सोयाबीन, मुग, हरभरा, भुईमुग, तूर, उडीद आदी पिक उत्पादनात 20 टक्क्यापेक्षा जास्त वाढ पहायला मिळते. अझोटोबक्टर या नत्र स्थिर करणाऱ्या जिवाणूमुळे पिकांची जोमदार वाढ होऊन उत्पादनात 10 ते 25 टक्क्यापर्यंत वाढ होते. तसेच तृणधान्य, गळीतधान्य, भाजीपाला, फळझाडे, बटाटा, ऊस, कापूस, हळद, आले, फुलझाडे आदी पिकांसाठी अझोटोबक्टर, पीएसबी व पालाश विरघळवीणारे जिवाणू खत (बायो-एनपीके) यांचे एकत्रित मिश्रण वापरता येते, अशी माहिती डॉ. अनिल धमक यांनी सांगितले.

 

नक्की वाचा  :  मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

 

 

द्रवरूप जिवाणू खते (Liquid Bio-fertilizers)  वापरण्याच्या पध्दती

 

बीजप्रक्रिया

 

एकदल पिके म्‍हणजेचे ज्वारी, तूर, बाजरी, मका, कापूस, गहू, साळ, आदी पिकांमध्‍ये अझोटोफॉस (अझोटोबक्टर व पीएसबी मिश्रण) हे जीवाणु संवर्धन वापरता येते. सदर 200 मिली जिवाणू संवर्धने प्रती 10 किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.

 

द्विदल पिके म्‍हणजेचे सोयाबीन, भुईमुग, तूर, मूग, उडीद, हरभरा इत्‍यादी मध्‍ये रायझोफॉस (रायझोबीयम व पीएसबी मिश्रण) हे जीवाणु सवंर्धन वापरता येते. हे जीवाणु संवर्धन सोयाबीन व भुईमुग करिता 100 मिली जिवाणू संवर्धने प्रती 10 किलो तर तूर, मूग, उडीद, हरभरा ई. करिता 200 मिली जिवाणू संवर्धने प्रती 10 किलो बियाण्यास सारख्या प्रमाणात लावून लगेच पेरणी करावी.

 

ठिबक सिंचनाद्वारे बायो-एनपीके:  हे जीवाणु सवंर्धन हळद, ऊस, केळी, आले, टरबूज, खरबूज, फळझाडे आदी फळपिकांकरिता उपयुक्‍त असुन एकरी २ लिटर द्रवरूप जिवाणू संवर्धने वेंचुरी टॅंक मध्ये टाकून पिकास देण्यात यावीत.

 

उभ्या पिकास पिकाच्या मुळा भोवती बायो-एनपीके हे जीवाणु संवर्धन देता येते. 200 मिली द्रवरूप जीवाणू संवर्धणे 15 लिटर नोझल काढलेल्या पाठीवरच्या फवार्‍याच्या सहाय्याने मुळा भोवती आळवणी करावी. एक एकरासाठी 10 फवार्‍याच्या टाक्या किंवा 2 लिटर प्रती एकर याचा वापर करावा.

 

द्रवरूप जिवाणू खते (Liquid Bio-fertilizers)  वापरतावेळी घ्यावयाची काळजी

जिवाणू खताच्या बाटल्या उष्ण ठिकाणी किवा थेट सूर्य प्रकाशात ठेऊ नयेत. द्रवरूप जिवाणू खते कीटकनाशके, बुरशीनाशके, किवा रासायनिक खतासोबत मिसळू नयेत. द्रवरूप जिवाणू खते लावल्यानंतरथोडा वेळ सावलीत वाळवावीत. जमिनीत दिल्यानंतर त्यांना जिवंत ठेवण्यासाठी जमिनीत ओल असणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी प्रकल्पाचे प्रमुख अन्वेषक डॉ. अनिल धमक (९४२००३३०४६),  सय्यद मुन्शी (९९६०२८२८०३) यांच्याशी संपर्क साधावा.

 

विक्री व उपलब्धता

 

द्रवरूप जिवाणू खताची विक्री ही वसंतराव नाईक कृषि विद्यापीठ मध्ये मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र  विभागामध्ये आहे तरी सर्व इच्छुक शेतकरी बांधवांनी येथे जाऊन खरेदी करावी.

 

अधिक वाचा :

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …

* फळबाग सोडत यादी जून 2023

* कुसुम सोलर पंप योजना अपडेट जून 2023

error: Content is protected !!