E-Peek Pahani : राज्यातील पीक पाहणी प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी महसूल विभागाने पुढाकार घेतला असून, आता पीक पाहणीच्या केवळ काही नोंदींची नाही, तर १०० टक्के नोंदींची पडताळणी करण्यात येणार आहे. या बाबतची नवीन नियमावली जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाली असून, डिजिटल क्रॉप सर्वेप्रकल्पांतर्गत आता पीक नोंदणी अधिक कडक करण्यात आली आहे. (E-Peek Pahani)
पीक पाहणीच्या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप आणि चुका टाळण्यासाठी महसूल विभागाने महत्त्वाचे बदल केले आहेत. त्यात प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ई पीक पाहणी सहायक नियुक्त केले जाणार आहेत, या पीक पाहणी सहायकांनी केलेल्या नोंदींची ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठी हे पूर्णपणे पडताळणी करतील आणि एकही नोंद तपासणीशिवाय राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाणार आहे. (E-Peek Pahani)
खरीप आणि रब्बी हंगामानुसार गावांची वर्गवारी करून ती एमआयएस प्रणालीवर अद्ययावत केली जाईल. या मोहिमेचे वैशिष्ट्य म्हणजे पीक पाहणी प्रक्रियेत शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनाही सहभागी करून घेतले जाणार आहे. शाळा, महाविद्यालये आणि कृषी विद्यापीठांमधून विद्यार्थ्यांना ई-पीक पाहणीबाबत तांत्रिक माहिती दिली जाईल, जेणेकरून ते आपल्या पालकांना अचूक नोंदणीसाठी मदत करू शकतील. महसूल विभाग, कृषी विभाग आणि एनआयसी यांच्या समन्वयाने ही प्रक्रिया राबविली जात आहे. तसेच मोबाईल ॲपद्वारे केलेल्या नोंदींमध्ये काही त्रुटी किंवा अपूर्ण माहिती आढळल्यास, ती त्वरित दुरुस्त करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावरून सूचना दिल्या जाणार आहेत. (E-Peek Pahani)
खरीप हंगाम 2026 सुरू झाल्यानंतर प्रशासन सुस्त बसणार नाही तर दर १५ दिवसांनी पीक पाहणी कामकाजाचा प्रगती अहवाल घेतला जाईल. ज्या तालुक्यांमध्ये ई-पीक पाहणीचा वेग कमी आहे, तिथे विशेष मोहीम राबवून काम पूर्ण करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत.
तर, या बदला मुळे आता प्रत्येक गावा मध्ये १००% ई पीक पाहणी होण्याची शक्यता आहे व तसेच सर्व शेतकर्यांची ई पीक पाहणी होईल आणि कोणताही शेतकरी पीक पाहणी नोंद नसल्याने होणार्या नुकसाना पासून दूर राहील.
* कापूस भावांतर योजना राबविण्यात येणार | कापूस उत्पादक शेतकर्यांसाठी खुशखबर
* खरीपासाठी खतांच्या अनुदानात वाढ | शेतकर्यांसाठी आनंदाची बातमी
* उन्हाळी हंगामासाठी ई-पीक पाहणी सुरु | पहा कधीपर्यंत करता येणार नोंदणी?
* असे तपासा तुमचा पीक विमा स्टेटस | पहा तुमच्या मंडळा मध्ये किती ने मंजूर?
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
