Posted in

VB G Ram Ji Wage Rates 2026 : नवीन ‘व्हीबी जी राम जी’ योजनेत मिळणार एवढं मजुरी दर?

VB G Ram Ji Wage Rates 2026
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

VB G Ram Ji Wage Rates 2026 : केंद्र शासनाची नव्या स्वरूपातील ‘व्हीबी जी राम जी’ (विकसित भारत- ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान) १ जुलैपासून लागू झाली आहे. मात्र योजनेत दैनंदिन मजुरीत केवळ 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. चालू वर्ष साठी मजुरीचा दर ३१२ रुपयांवरून ३१७ रुपये प्रति दिन करण्यात आला असला, तरी वाढत्या महागाईच्या तुलनेत ही वाढ अत्यल्प असल्याचे मत त्यांच्याकडून व्यक्त केले जात आहे. (VB G Ram Ji Wage Rates 2026)

 

रोजगार हमी योजनेचे सुधारित मजुरी दर दरवर्षी १ एप्रिलपासून लागू होतात. मात्र यंदा सुधारित दर जाहीर होण्यास विलंब झाल्याने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत जुन्याच दराने मजुरी देण्यात आली. त्यानंतर १ जुलैपासून सुधारित दर लागू करण्यात आला.

 

त्यामुळे प्रत्यक्षात ग्रामीण मजुरांना केवळ 5 रुपयांची वाढ मिळाल्याने त्यांच्या उत्पन्नात फारसा फरक पडणार नसल्याची भावना व्यक्त होत आहे. केंद्र सरकार प्रत्येक राज्यासाठी ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे रोजगार हमी योजनेतील मजुरी निश्चित करते. त्यासाठी संबंधित राज्यातील राहणीमानाचा खर्च, जीवनावश्यक वस्तूंचे दर तसेच स्थानिक बाजारपेठेतील अकुशल मजुरीचे दर विचारात घेतले जातात. मात्र प्रत्यक्षात महागाईच्या तुलनेत मजुरीतील वाढ मर्यादित राहत असल्याची चर्चा ग्रामीण भागात आहे. VB G Ram Ji Wage Rates 2026

 

योजनेच्या नव्या स्वरूपात नोंदणी आणि काम मागणीची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यात आली आहे. नोंदणीकृत कुटुंबातील कोणताही प्रौढ सदस्य कामासाठी अर्ज करू शकणार असून अर्जाची डिजिटल नोंद केली जाणार आहे. महिला, दिव्यांग, वृद्ध तसेच तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र ग्रामीण रोजगार हमी पत्रिका उपलब्ध राहणार आहे. कामासाठी अर्ज ग्रामपंचायत किंवा कार्यक्रम अधिकाऱ्यांकडे लेखी अथवा तोंडी करता येणार आहे VB G Ram Ji Wage Rates 2026

 

 

error: Content is protected !!