Farm Loan Waiver : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटी रुपयांची कर्जमुक्ती मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी ५ जुलैनंतर होईल, असे कृषिमंत्री यांनी विधानसभेत सांगितले होते. पण आता प्रत्यक्षात याचा लाभ मिळण्यास विलंब होणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. Farm Loan Waiver
कोणत्या बँकांकडून घेतलेले पीक कर्ज माफीसाठी पात्र?
शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी मिळणार आहे. तर नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ दिला जाणार आहे. राष्ट्रीयकृत, खासगी, ग्रामीण, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, प्राथमिक कृषी पतसंस्था (सोसायट्या) यांच्याकडून घेतलेले पीक कर्ज या योजनेत पात्र आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमीन धारणेची अट नाही. शेतकऱ्यांनी घेतलेल्या पुनर्गठित पीक कर्जालाही या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. Farm Loan Waiver
कोणत्या कालावधीतील पीक कर्ज माफ होणार?
१ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेले पीक कर्ज जर ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत असेल आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत जे भरले नसेल; तर ते माफ होणार आहे. जर कर्ज २ लाखांहून अधिक असेल. तर शेतकऱ्याला २ लाखांवरील अतिरिक्त रक्कम प्रथम बँकेत भरावी लागणार आहे. त्यानंतरच शासनाकडून २ लाख रुपये कर्जमाफीची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची म्हणजेच २ लाखांवरील रक्कम बँकेत जमा करण्यासाठी ३१ मार्च २०२७ पर्यंत मुदत दिली आहे. Farm Loan Waiver
या योजनेचा थेट लाभ शेतकऱ्यांना लवकर मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आपली ‘आधार’ संदर्भातील माहिती बँकेच्या शाखेत देण्याचे आवाहन सहकार विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच पात्र शेतकऱ्यांची यादी बँक शाखा, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय आणि पोर्टलवर प्रसिद्ध केली जाणार आहे.
