PoCRA 2.0 Update: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दूसरा टप्पा | विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार
PoCRA 2.0 Update: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा PoCRA) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील 4682 गावे, जळगाव जिल्ह्यातील 460 गावे, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील 142 गावे अशा एकूण 5220 गावांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.
नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (PoCRA 2.0 Update) चा दूसरा टप्पा हा कार्यान्वित करून त्यामध्ये विदर्भातील उर्वरित पाच जिल्ह्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यास मंत्रिमंडळ बैठकीत (दि 28 जून 2023) निर्णय घेण्यात आला आहे.
पोकरा प्रकल्पाच्या दुसर्या टप्प्यासाठी 6000 कोटी रुपये खर्च येणार आसून विदर्भातील नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये प्रकल्पाचा दूसरा टप्पा राबविण्यात येणार आहे. (PoCRA 2.0 Update)
तर, पोकरा 2.0 मध्ये विदर्भातील नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपुर आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश असणार आहे. या जिल्ह्यातील गावांची यादी ही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असून ही योजना या जिल्ह्यांमध्ये 2024 पासून सुरू करण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा :
* मंत्रिमंडळ बैठकीतील ‘हे‘ मोठे निर्णय
* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा
* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण
* “या” शेतकर्यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता