Turmeric Cultivation: हळद लागवड पद्धत, बेणे प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन सविस्तर माहिती | Fertilizer Management

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Turmeric Cultivation: या लेखा मध्ये आपण हळद लागवड पद्धत, बेणे प्रक्रिया आणि खत व्यवस्थापन बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

Turmeric Cultivation

 

हळद लागवड पद्धती (Turmeric Cultivation)

हळद लागवडीच्या पाणी देण्याच्या प्रकारानुसार दोन प्रमुख पद्धती आहेत. (Turmeric Cultivation)

 

१. सरी वरंबा पद्धत :- पाटाने पाणी देण्याचे असल्यास ह्या पद्धतीत सर्वप्रथम शिफारशीप्रमाणे सरी वरंबे पाडून घ्याव्यात. दोन वरंबा मध्ये ७५ ते ९० सें.मी. अंतर ठेवावे. तर लांबी उताराप्रमाणे व वरंब्याची उंची १५ सें.मी. ठेवावी. वरंब्याचे अर्ध्या उंचीवर एका बाजूस 30 से.मी. अंतरावर खुरप्याने ०८ ते १० सें.मी. खोल खड्डा खोदून प्रत्येक खड्ड्यात एक जेठे हे गड्डा ठेवून मातीने झाकून घ्यावा या पद्धतीने एक हेक्टर लागवडीसाठी २००० ते २५०० किलो जेठे गड्डे लागतात. लागवडीचे अंतर ६०×३० सें.मी. ठेवून ६-७ सरीवरंब्याचे पाणी देण्यासाठी एक नागमोडी वारवाण करावे. Turmeric Cultivation

 

२. रुंद वरंबा सरी पद्धत:- ठिबक सिंचन उपलब्ध असल्यास  या पद्धतीने हळद लागवड करावी. या पद्धतीत बीबीएफ यंत्राच्या साहायाने  १.५ मीटर अंतरावर सऱ्या पाडाव्यात जेणेकरून ९० से.मी.चा गादीवाफा (टॉप) तयार होतो आणि त्या गादीवाफ्यावर ४५×१५ से.मी.अंतरावर  ८ ते १० से.मी.खोलीवर हळदीचे कंद लावावेत.

या पद्धतीने प्रचलित पद्धतीपेक्षा गड्डे चांगले पोसून उत्पादनात वाढ होते. या पद्धतीत पाण्याचा योग्य निचरा होतो, हवा खेळती राहते, कंदाची वाढ चांगल्या रीतीने होते, विद्राव्य खते पण ठिंबक सिंचन मधून देता येतात. सध्या अनेक शेतकरी या पद्धतीने हळद लागवड करत आहेत. Turmeric Cultivation

 

बेणेप्रक्रिया

कंदमाशी व कंदकुज रोग हळद पिकात होऊ नये म्हणून बेण्याला खालील प्रमाणे कीटकनाशकाची व बुरशीनाशकाची प्रक्रिया करावी याकरिता क्विनॉलफॉस २५% प्रवाही २० मिली + कार्बेन्डाझिम ५०% -१० ग्रॅम प्रति १० लि.पाण्याचे द्रावण किंवा डायमिथोएट-३०% प्रवाही १० मी.ली.+ डायथेन एम-४५-२५ ग्रॅम १० लि. पाण्याचे द्रावण तयार करून बेणे १० ते १५ मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.

 

खत व्यवस्थापन

हळद पिकाला सोबत दिलेल्या तक्त्यानुसार ठिबक संचातुन खते द्यावेत

Turmeric Cultivation

 

 

कृषि संदेश :

डॉ.जी.डी. गडदे

डॉ.डी.डी.पटाईत व

श्री.एम.बी.मांडगे

अधिक माहितीसाठी कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र,वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी,कृषि माहिती वाहिनीच्या फोन क्र.०२४५२-२२९००० वर संपर्क साधावा.

 

 

अधिक वाचा :

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

* रासायनिक खतांचे दरपत्रक पहीतले का?

error: Content is protected !!