Sugarcane Harvester GR: ऊसतोडणी यंत्रास अनुदान देण्याकरिता मान्यता मिळाली | शासन निर्णय | राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत सन २०२३-२४ या वर्षात ऊसतोडणी यंत्रास अनुदान प्रकल्प राबविण्यास प्रशासकीय मान्यता

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Sugarcane Harvester GR: कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टल द्वारे विविध कृषि यंत्र आणि औजारे यांना अनुदान दिले जाते आणि यामध्ये विविध कृषि यंत्र औजारे जसे की पेरणी यंत्र, रोटाव्हेटर, ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. परंतु, आता महाडीबीटी पोर्टल द्वारे ऊसतोडणी यंत्रास देखील अनुदान देण्यात येणार आहे आणि यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

Sugarcane Harvester GR

 

ऊसतोडणी यंत्रा अनुदान शासन निर्णय

राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत केंद्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मा. मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली दि. २० सप्टेंबर, २००७ च्या शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समिती गठित करण्यात आलेली आहे. त्यानुसार मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीची ३२ वी बैठक दि. ११ जानेवारी, २०२३ रोजी पार पडली. या बैठकीमध्ये ऊस तोडणीतील मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी व ऊसाच्या गाळपासाठी होणारा विलंब टाळण्याच्या अनुषगाने सन २०२२- २३ मध्ये ४५० व सन २०२३-२४ मध्ये ४५० अशा एकूण ९०० ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester GR) खरेदीसाठी अनुदान देण्याच्या प्रकल्पासाठी रुपये ३२१.३० कोटी एवढ्या प्रकल्प किंमतीस मान्यता देण्यात आली आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सन २०२२-२३ व सन २०२३- २४ मध्ये ऊस तोडणी यंत्रास (Sugarcane Harvester GR) अनुदान देणे बाबत दि. २०.०३.२०२३ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास अल्पावधी शिल्लक असताना सदरचा शासन निर्णय निर्गमित झाल्याने सन २०२२-२३ मधील ४५० ऊस तोडणी यंत्रांचे लक्षांक हे चालू आर्थिक वर्प २०२३-२४ मध्ये वर्ग करून आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये सन २०२२-२३ मधील ४५० व चालू आर्थिक वर्ष सन २०२३-२४ मधील ४५० अशा एकूण ९०० ऊस तोडणी यंत्रांना (Sugarcane Harvester GR) अनुदान देणेबाबतच्या रू.३२१.३० कोटी इतक्या रकमेच्या प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

 

 

त्यानुसार, राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ३२ व्या राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीच्या दि.११/०१/२०२३ रोजी झालेल्या बैठकीस अनुसरून कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्सव्यवसाय विकास विभागाचे क्र.संकीर्ण-२०२२/ प्र.क्र.१६८/पार्ट-१/१४-अे, दि.३०/०१/२०२३ चे शासन निर्णय क्रमांकः ससाका-०७२२/प्र.क्र. २१६/२५-स, इतिवृत्तात मंजुरी दिल्याप्रमाणे खालील तक्त्यात नमूद केल्यानुसार रूपये ३२१.३० कोटी रकमेच्या प्रकल्प प्रस्तावास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. Sugarcane Harvester GR

 

sugarcane harvester table

 

१. सन २०२३-२४ या वर्षात राष्ट्रीय कृषि विकास योजनेअंतर्गत ऊस तोडणी यंत्रास अनुदान हा प्रकल्प राज्यात राबविण्यासाठी रू. ३२१.३० कोटी निधीच्या कार्यक्रमास प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

 

२. प्रस्तुत प्रकल्प राष्ट्रीय कृषि विकास योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून त्या योजनेच्या निकषानुसार मंजूर निधीपैकी केंद्र शासनाचा हिस्सा ६० टक्के व राज्य शासनाचा हिस्सा ४० टक्के राहील.

 

३. सदर प्रकल्प राबविण्याच्या सविस्तर मार्गदर्शक सूचना साखर आयुक्त यांनी निर्गमित कराव्यात.

 

४. सदर प्रकल्पाची अंमलबजावणी “महाडीबीटी” पोर्टलद्वारे करावी. (MahaDBT Farmer)

 

५.लाभार्थ्याकडून अर्ज महाडीबीटी पोर्टलवर स्विकारून ऑनलाईन सोडतीद्वारे (Lottery) लाभार्थ्याची निवड करावी.

 

६.सदर प्रकल्प रावविण्यासाठी साखर आयुक्‍त, महाराष्ट्र राज्य अंमलबजावणी यंत्रणा म्हणून काम पाहतील. साखर आयुक्तांनी सदर प्रकल्प राबविताना त्याची अंमलबजावणी, संनियंत्रण आणि मुल्यमापन करणेबावत सहकार, पणन व वस्रोद्योग विभाग /कृपी विभाग यांच्याशी आवश्‍यक तो समन्वय ठेवावा. तसेच वेळोवेळी प्रकल्प अंमलबजावणी विपयक आर्थिक व भौतिक प्रगती अहवाल सहकार विभागास/ कृपी विभागास सादर करावा.

 

७.वरील प्रकल्पाची अंमलबजावणी, संनियंत्रण व मुल्यमापन केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकपांनुसार साखर आयुक्त यांनी करावी.

 

८. साखर आयुक्त यांनी प्रस्तुत प्रकल्प अंमलबजावणीच्या अनुपंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मंजुरी समितीने तसेच केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे आवश्‍यक कार्यवाही करावी.

 

 

शासन निर्णय डाऊनलोड करा

 

ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester GR) अनुदान मान्यता शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी : येथे भेट द्या

ऊसतोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज

ऊसतोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : सविस्तर येथे पहा

 

 

अधिक वाचा :

* PoCRA 2.0 Update विदर्भातील “या” जिल्ह्यांचा समावेश असणार

* मंत्रिमंडळ बैठकीतील हेमोठे निर्णय

* सोयाबीन खत व्यवस्थापन | ही खते वापरा

* सोयाबीन चे सर्वाधिक उत्पादन देणारे टॉप 10 वाण

* “या” शेतकर्‍यांनी लवकर हे काम करा तरच मिळणार पुढील हफ्ता

error: Content is protected !!