Chana Procurement : राज्यात कमी बाजारभावामुळे अडचणीत सापडलेल्या हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने जाहीर केलेल्या हमीभावानुसार आज दिनांक 01/03/2026 पासून नवीन हरभऱ्याची नोंदणी व खरेदी सुरू झाली होती. Nafed Chana Procurement
हमीभावामुळे शेतकऱ्यांना आधार यंदा नवीन हरभऱ्यासाठी शासनाने 5875 रुपये प्रति क्विंटल असा हमीभाव निश्चित केला आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजारात नवीन हरभऱ्याची आवक वाढू लागली होती. मात्र, खुल्या बाजारात शेतकऱ्यांना 5200 ते 5700 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत होता. हा दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत होते. शेतकऱ्यांची मागणी नुसार कमी बाजारभावामुळे हरभरा हमीदराने खरेदी सुरू करण्याची मागणी शेतकरी करत होते. या पार्श्वभूमीवर शासनाने तातडीने निर्णय घेत 1 मार्चपासून खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. (Nafed Chana Procurement)
परंतु, या हरभरा खरेदी साठी शासनाने दिनांक ३१ मार्च, २०२६ पर्यंत हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करण्याचे कळविण्यात आले होते. आता, सद्यस्थितीत हरभरा पिकाचे बाजारभाव व शेतकऱ्यांचे हित विचारात घेऊन नाफेड या केंद्रीय नोडल संस्थेने केलेल्या विनंतीनुसार हरभरा पिकाच्या ऑनलाईन नोंदणीकरिता दिनांक ०६ एप्रिल, २०२६ ते दिनांक १५ एप्रिल, २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

नोंदणी कशी करावी? Nafed Chana Procurement
हमीभाव दराने हरभरा विक्री करण्यासाठी शेतकर्यांनी अगोदर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे आणि ही नोंदणी हे आपण 1 मार्च ते 15 एप्रिल 2026 पर्यन्त ई समृद्धी मोबाइल ॲप वरून करू शकता. तर, नोंदणी करण्यासाठी आजच e samruddhi अॅप्लिकेशन घ्या आणि आपली नोंदणी पूर्ण करा. (Nafed Chana Procurement)
ई समृद्धी मोबाइल अॅप्लिकेशन : येथून डाऊनलोड करा
नाफेड हरभरा नोंदणीसाठी ‘ई-समृद्धी’ (e-Samridhi) मोबाईल ॲप्लिकेशनवर नोंदणी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. तुम्ही खालील पायऱ्या फॉलो करून नोंदणी करू शकता.
ई-समृद्धी ॲपवर नोंदणी करण्याची प्रक्रिया :
-
ॲप डाउनलोड करा: सर्वप्रथम Google Play Store वरून ‘e-Samridhi’ (NAFED) हे अधिकृत ॲप डाउनलोड करा.
-
भाषा निवडा: ॲप उघडल्यानंतर तुमची सोयीची भाषा (मराठी किंवा इंग्रजी) निवडा.
-
नवीन नोंदणी (Registration): जर तुम्ही पहिल्यांदाच वापरत असाल, तर ‘New Farmer Registration’ किंवा ‘नोंदणी करा’ या पर्यायावर क्लिक करा.
-
मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन: तुमचा चालू मोबाईल नंबर टाका. त्यावर एक OTP येईल, तो टाकून व्हेरिफाय करा.
-
वैयक्तिक माहिती भरा:
-
शेतकऱ्याचे पूर्ण नाव.
-
आधार कार्ड नंबर.
-
पत्ता (गाव, तालुका, जिल्हा).
-
-
बँक तपशील: ज्या खात्यावर पैसे जमा व्हायला हवेत, त्या बँकेचा IFSC कोड आणि खाते क्रमांक अचूक भरा.
- स्कीम निवडा : PSS Chana Procurement असे निवडा
-
सातबारा आणि पिकाची माहिती:
-
तुमचा सातबारा (7/12) उतारा अपलोड करा.
-
पिकाच्या नोंदीमध्ये ‘हरभरा’ निवडा आणि किती क्षेत्रावर पेरणी केली आहे ते नमूद करा.
-
-
नाफेड केंद्र निवडा : विक्री साठी तुमचे जवळील नाफेड केंद्र निवडा.
-
अर्ज सबमिट करा: सर्व माहिती तपासून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
तर, वरील पद्धतीने आपण नाफेड नोंदणी करू शकतो. त्यानंतर तुमचं नंबर आल्यावर आपणास एसएमएस द्वारे कळविले जाते. ज्या दिवशी नंबर आला आहे त्या दिवशी आपण आपला हरभरा आणि कागदपत्रे ही सोबत घेऊन सेंटर जावे.
* रोजगार हमी योजना मध्ये आता “फेस स्कॅन” द्वारे हजेरी होणार
* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

