Digital Shetishala : हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड आणि नैसर्गिक आपत्तींमुळे पारंपारिक कोरडवाहू शेती संकटात सापडली असून उत्पादन खर्च वाढत आहे. तर, यावर मात करण्यासाठी कृषी विभागांतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत महाराष्ट्र राज्याकरिता ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ सुरू केले आहे. हे अभियान शेतीचा उत्पादन खर्च कमी करणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाची हमी देणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. हे अभियान यशस्वी करण्यासाठी कृषी विभागाबरोबरच, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, उमेद, माविम, पशुसंवर्धन विभाग इ. यंत्रणादेखील सहभागी होत आहेत. Digital Shetishala
या अभियानाचा एक टप्पा म्हणजे हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर आधारित विशेष डिजिटल ऑनलाइन शेतीशाळांचे आयोजन करणे हा आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ महिन्यात चार विशेष डिजिटल शेती शाळा’ आयोजित करण्यात येत आहेत. राज्यातील सर्व प्रकारच्या पिक पद्धतींना उपयुक्त असणाऱ्या तंत्रांची माहिती एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विद्यापीठे आणि कृषी विभागातील तज्ञ आणि प्रगतशील शेतकरी यांचेमार्फत या डिजिटल शेतीशाळामध्ये ज्ञानाचे आदान प्रदान होणार आहे. Digital Shetishala
विशेष डिजिटल शेतीशाळांचे वेळापत्रक व विषय
दिनांक : १ एप्रिल २०२६
वेळ : सायंकाळी ०७ : ३०
विषय : पेरणीपूर्व तंत्रज्ञान: बेड तयार करणे व बेडवर टोकण करणे, शून्य/कमीत कमी मशागत करणे, आंतरपीक पद्धत, बियाणे उगवण क्षमता तपासणी आणि बीजप्रक्रिया.
दिनांक : ८ एप्रिल २०२६
वेळ : सायंकाळी ०७ : ३०
विषय : जैविक व नैसर्गिक निविष्ठा उत्पादन: बीजामृत, जीवामृत, लिंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, ट्रायकोडर्मा तयार करण्याच्या पद्धती व फायदे.
दिनांक : १५ एप्रिल २०२६
वेळ : सायंकाळी ०७ : ३०
विषय : एकात्मिक कीड व्यवस्थापन: सापळा पिके, पक्षी थांबे, चिकट सापळे, मित्र किटकांचे संवर्धन, लिंबोळी आणि दशपर्णी अर्काचा वापर.
दिनांक : २२ एप्रिल २०२६
वेळ : सायंकाळी ०७ : ३०
विषय : भात शेतीसाठी सुधारित लागवड तंत्र: भाताची थेट पेरणी (DSR), श्री पद्धत आणि भात लावणीसाठी यांत्रिकी पद्धत.
सर्व शेतीशाळा वर नमूद केलेल्या तारखांना सायंकाळी ७.३० वाजता सुरु होणार असून या शेती शाळांचे लाइव्ह (LIVE) प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पानी फाउंडेशन आणि उमेद च्या YouTube चॅनेलवर केले जाणार आहे. Digital Shetishala
सर्व शेतकरी, महिला गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य, कृषी मंडळे, बिजोत्पादक, फार्मर कप स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणारे निमंत्रक व शेतकरी गट, वनपट्टे धारक या सर्वांनी मोठ्या संख्येने डिजिटल शेती शाळांना जॉईन व्हावे असे आवाहन कृषी विभाग आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत करण्यात येत आहे. Digital Shetishala
शेतीशाळा जॉइन करण्यासाठी : चॅनल फॉलो करा
सर्व शेतकरी बांधवांनी वरील चॅनल ला फॉलो करावे जेणेकरून शेतीशाळा वर्ग सुरू झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी झूम मीटिंग आणि live ची लिंक शेअर करण्यात येईल.
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती पहा
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
