Havaman andaj : राज्यात पावसाची सक्रियता कायम असून 29 जुलै वार बुधवार रोजीही अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी 30 ते 50 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता देखील भारतीय हवामान विभागाने व्यक्त केली आहे. घाटमाथ्यासह 34 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच 3 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Havaman andaj
कोकणात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पालघर आणि ठाणे जिल्ह्यांतही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचे वारे वाहण्याचा अंदाज आहे. यासर्व ठिकाणी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. Havaman andaj
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि नाशिक घाटमाथा भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस आणि काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातही हलका ते मध्यम पाऊस आणि मेघगर्जनेचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Havaman andaj
पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र पुणे, सातारा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर वगळता सर्वच ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Havaman andaj
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता असून काही ठिकाणी जोरदार सरी कोसळू शकतात. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Havaman andaj
अमरावती, अकोला, भंडारा, बुलढाणा, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस आणि ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत मुसळधार पावसाचाही अंदाज आहे. त्यामुळे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. Havaman andaj
राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे मेघगर्जना सुरू असताना शेतात किंवा बाहेर जाणे टाळावे, झाडाखाली आश्रय घेऊ नये तसेच शेतकऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला हवामान विभागाने दिला आहे.








