Posted in

MahaDBT Fund Distribution : केंद्रा कडून कृषि विभागाला मंजूरी पेक्षा जास्त निधि | लवकरच महाडीबीटी तुषार, ठिबक, कृषि यंत्र चे अनुदान मिळणार

Mahadbt fund distribution
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

MahaDBT Fund Distribution: कृषि विभागा मार्फत राज्यातील शेतकर्‍यांना कृषि यंत्र अनुदान, सिंचन साधने अनुदान मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाइन अर्ज मागविले जातात. त्यानंतर, केंद्र व राज्य शासनाच्या लक्षांक व निधि नुसार महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषि यांत्रिकीकरण/इतर घटकाची सोडत काढल्या जाते आणि सोडत मध्ये निवड झालेल्या शेतकर्‍यांनी घटक खरेदी केल्यानंतर त्यांना अनुदान वितरण केले जाते. MahaDBT Fund Distribution

 

चालू आर्थिक वर्ष समाप्त होण्यास अवघा एक आठवडा बाकी असतानाच केंद्र शासनाने मंजुरी पेक्षाही जास्त निधी पाठवून राज्याच्या कृषी विभागाला एक प्रकरचा सुखद धक्का दिला आहे. कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी सांगितले, की राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून (RKVY) २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता ७३४ कोटी रुपयांचा निधी देण्याचे केंद्राने घोषित केले होते. परंतु आतापर्यंत ७६७ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी केंद्राने पाठवला आहे. (MahaDBT Fund Distribution)

 

केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यासाठी कृषी विभागाच्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी यंदा उत्तम नियोजन केले. त्यामुळे केंद्राने आधीच्या टप्प्यात पाठविलेला निधी वेळेत खर्च होऊ शकला. तसेच योजना राबविताना आलेले अडथळे दूर करण्यासाठी आयुक्तालय व सचिवालय स्तरावर संयुक्तपणे चांगला पाठपुरावा झाला. त्यामुळेच केंद्राने मंजुरीपेक्षा ५७ कोटींचा जास्त निधी पाठवला आहे. (MahaDBT Fund Distribution)

 

केंद्राने ‘आरकेव्हीवाय’मधून राज्याचा एकूण ८८१ कोटी रुपयांचा वार्षिक आराखडा मंजूर केला होता. त्यासाठी केंद्र अनुदानाचा हिस्सा म्हणून ७३४ कोटी ३० लाख रुपये देण्याचे मान्य केले होते. त्यानुसार दोन टप्प्यांत आतापर्यंत ७०९ कोटी ९९ लाख रुपये केंद्राकडून मिळाले होते. अलीकडेच पुन्हा ५७ कोटी ५३ लाख रुपये केंद्राने पाठविले आहे. (MahaDBT Fund Distribution)

 

‘‘राज्याला पाठविलेला निधी वेळेत खर्च होतो की नाही, हे प्रत्यक्ष वेळेत संनियंत्रित करणारी प्रणाली केंद्र शासनाने विकसित केली आहे. या प्रणालीत राज्याची कामगिरी चांगली दिसून येत होती. विशेष म्हणजे महाडीबीटीवर लॉटरीच्या प्रतीक्षेत असलेले ४७ लाख अर्ज राज्य शासनाने निकाली काढले. त्यातील अवघ्या चार लाख अर्जदारांनी योजनेत भाग घेतला. त्यामुळे निधी वेळेत खर्च झाला. परिणामी, पुढील निधी पाठविण्याचा केंद्राचा मार्ग मोकळा होत गेला,’’ असे आयुक्तालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले.

 

राज्य शासनाने कृषी यांत्रिकीकरण योजनेतून अनुदान वाटप करण्या साठी १५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. केंद्राच्या कृषी यांत्रिकीकरण अभियानाच्या व्यतिरिक्त राज्याकडून स्वतंत्रपणे एक यांत्रिकीकरण योजना राबविली जाते. त्यासाठी यंदा ४०० कोटी रुपये निधी दिला जाणार होता. त्यानुसार दुसऱ्या टप्प्यातील दीडशे कोटीचा निधी राज्याने मंगळवारी २४ मार्च ला कृषी आयुक्तालयास उपलब्ध करून दिला आहे.

 

योजना निहाय मंजूर व उपलब्ध झालेला निधि (रुपये कोटी )

 

योजनेचे नाव  मंजूर निधी उपलब्ध निधी
आरकेव्हीवाय RKVY २४३.११ २१८.८
प्रति थेंब अधिक पीक (PMKSY ) २८६.३६ ३५७.९५
परंपरागत कृषी विकास योजना  ३९.३ १७.३४
जिरायती क्षेत्रविकास कार्यक्रम  २५.९५ १५.५६
कृषी यांत्रिकीकरण उपअभियान  ९९.१९ १२३.०६

 

कोणत्या शेतकर्‍यांना मिळणार हे अनुदान?

 

ज्या शेतकर्‍यांचे राज्य कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत कृषि यंत्र व औजारे खरेदी होऊन कृषि अधिकारी यांची तपासणी पूर्ण झाली आहे असे सर्व शेतकरी हे या अनुदानास पात्र आहेत. तरी, हे अनुदान पुढील 7 दिवसांत पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. (MahaDBT Fund Distribution)

 

 

हे पण पहा :

 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

 

error: Content is protected !!