Posted in

Maharashtra Rain Update : अर्णव चक्रीवादळामुळे राज्यात पावसाचा इशारा, असा आहे पाच दिवसांचा अंदाज?

Maharashtra rain update arnav tornado
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Maharashtra Rain Update : बंगालच्या उपसागरात ‘अर्णव’ चक्रीवादळ तयार झाले आहे. त्यामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान झाले आहे. हे चक्रीवादळ ओडिशातील गोपालपूरपासून ६१० किलोमीटर, तर आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणमपासून ६५० किलोमीटर अंतरावर होते. २६ ऑक्टोबरपर्यंत त्याची तीव्रता वाढण्याची, तर २७ ऑक्टोबरला अतितीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. तर, यामुळे मंगळवारपासून काही भागात पावसाचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. Maharashtra Rain Update

 

तर, या चक्रीवादळ मुळे राज्यात मंगळवारी यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर बुधवारी गडचिरोली जिल्ह्याला मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गोंदिया, चंद्रपूर, नागपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.

 

तर परभणी, धाराशिव, लातूर, जालना, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, सोलापूर, सातारा, सांगली, सातारा घाटमाथा, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गडगडाटासह हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. Maharashtra Rain Update

 

गुरुवारी गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, अमरावती, नागपूर, जालना, नाशिक, नाशिक घाटमाथा, पुणे घाटमाथा, रत्नागिरी, सातारा घाटमाथा, पुणे घाटमाथा जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, अहिल्यानगर, जळगाव, धुळे, नंदुरबार, पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पावसाचा हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे.

 

शुक्रवारी अहिल्यानगर आणि नाशिक घाटमाथ्यावर गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे. तर परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, सोलापूर, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, सातारा, पुणे, कोल्हापूर, रायगड, पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोल्हापूर घाटमाथ्यावर हलक्या सरी हजेरी लावण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

 

तर हे अर्णव चक्रीवादळ २८ ऑक्टोबरला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज आहे. यावेळी वाऱ्याचा वेग ताशी ११५ ते १२५ किलोमीटर, तर वाऱ्याचे झोत ताशी १४० किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतात. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि दक्षिण ओडिशाच्या किनारपट्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. Maharashtra Rain Update

 

error: Content is protected !!