Online Fertilizer Sales : आता खतांचा काळाबाजार, कृत्रिम टंचाई आणि खतांसोबत अन्य उत्पादने खरेदी करण्याची सक्तीला आळा घालण्यासाठी खत खरेदी प्रक्रियेवर डिजिटल नियंत्रण आणले जाणार आहे. 22 ऑक्टोबरपासून ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली लागू होत असून, शेतकऱ्यांना मोबाइल अॅपवरून खतांची आगाऊ नोंदणी करावी लागणार आहे. Online Fertilizer Sales
आशा ऑनलाइन नोंदणीनंतर मिळणाऱ्या क्यूआर कोडच्या आधारेच अधिकृत कृषी सेवा केंद्रातून खत खरेदी करता येईल. हा कोड केवळ ७२ तास साठी वैध राहणार असल्याने शेतकऱ्यांना निर्धारित मुदतीत खरेदी पूर्ण करावी लागणार आहे. 22 ऑक्टोबर पासून या प्रणालीची प्रत्यक्षात सुरवात होणार आहे. Online Fertilizer Sales
अशी करा नोंदणी ?
- शेतकऱ्यांना गुगल प्ले स्टोअरवरून अधिकृत एफएफएस अॅप डाऊनलोड करून राज्याची निवड करावी लागेल.
- त्यानंतर आधार प्रमाणीकरण किंवा शेतकरी ओळख क्रमांक (फार्मर आयडी) आणि ओटीपीच्या माध्यमातून लॉगिन करावे लागेल.
- स्वतःच्या किंवा भाडेतत्त्वावरील जमिनीचा जिल्हा, तालुका, गाव, सर्व्हे क्रमांक आणि लागवड केलेल्या पिकाची माहिती नोंदवावी लागणार आहे.
- कृषी विद्यापीठाच्या किंवा खत वापराच्या शिफारशीनुसार आवश्यक खतांचा प्रकार आणि बॅगांची संख्या निवडता येईल.
क्यूआर कोडची मुदत ७२ तास
नोंदणी पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्याला टोकन आणि क्यूआर कोड मिळेल. हा कोड ७२ तासांसाठी वैध असेल. या कालावधीत आपण निवडलेल्या विक्रेत्याकडे क्यूआर कोड दाखवून खत खरेदी करता येईल. विक्रेता कोड स्कॅन करून खत देईल आणि व्यवहाराची पावती उपलब्ध करून देईल. मुदतीत खरेदी न झाल्यास शेतकऱ्याला नव्याने नोंदणी करावी लागेल. त्यामुळे खतांची गरज लक्षात घेऊन नोंदणी आणि खरेदीचे नियोजन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. Online Fertilizer Sales
‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ (एफएफएस) प्रणाली : डाउनलोड करा

