MGNREGA Face Scan : राज्यामध्ये रोजगार हमी योजना मध्ये विविध कामे घेतली जातात जसे की सिंचन विहीर, जनावरांचे गोठे, फळबाग लागवड, शेततळे इत्यादि, आणि या कामांचे हजेरी पत्रक हे ऑफलाइन घेतले जाते आणि नंतर कार्यालया मध्ये ऑनलाइन डाटा फीड केला जातो. परंतु, आता या मध्ये बदल करण्यात आळा असून आता मजुराच्या फेस स्कॅन द्वारे ऑनलाइन जागेवरच हजेरी नोंदविली जाणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत (मनरेगा) पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने ‘चेहरा आधारित प्रमाणीकरण’ (Face Authentication) द्वारे हजेरी नोंदवणे अनिवार्य केले आहे.(MGNREGA Scheme) यामुळे जे मजूर जागेवर काम करण्यास असतील त्यांचे च हजेरी ऑनलाइन नोंदविली जाईल व जे कामावर नसतील त्यांची अनुपस्थिती नोंदविली जाणार आहे. यामुळे एक प्रकारे बोगसगिरी ला आळा च बसणार आहे. (MGNREGA Face Scan)
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत बोगसगिरीला आळा घालण्यासाठी ‘डिजिटल’ पाऊल उचलण्यात आलेले आहे. मनरेगा अंतर्गत होणाऱ्या कामांमध्ये अनेकदा बोगस मजूर नोंदणी आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी येत असतात. या ‘गळती’ला आळा घालण्यासाठी प्रशासनाने पारंपरिक हजेरीपटा ऐवजी आता मोबाइल ॲपद्वारे मजुरांचा प्रत्यक्ष फोटो घेऊन ‘रियल टाइम’ हजेरी नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मजुरांच्या बँक खात्यात थेट आणि अचूक मजुरी जमा होण्यास मदत होणार आहे.
तर, ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा-आधारित प्रमाणीकरण) प्रणाली बाबत आयुक्त, रोजगार हमी यांचे पत्रात खालील प्रमाणे सूचना आहेत :
नरेगाच्या कामात पारदर्शकता व जबाबदारीच्या तत्वाचे पालन करणासाठी दि २ मार्च २०२६ पासून NMMS अॅपद्वारे मजुरांच्या उपस्थिती सक्षमीकरणासाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’ (चेहरा-आधारित प्रमाणीकरण) प्रणालीचा प्रारंभ करण्यात आलेला आहे. उपस्थिती नोंदींची सत्यता सुनिश्चित करण्यासाठी, तसेच दुबार नोंदी किंवा दुसऱ्याव्यक्तीच्या जागी उपस्थित राहणे (proxy attendance) यांसारख्या समस्यांचे निवारण करण्यासाठी एक अतिरिक्त सुरक्षा उपाय म्हणून याची अंमलबजावणी करण्यात आली आहे. (MGNREGA Face Scan)
अंमलबजावणीच्या सुरुवातीच्या टप्प्यात मिळालेला अनुभव आणि राज्यांची सज्जता यांवर आधारित NMMS अॅपद्वारे उपस्थिती नोंदवण्यासाठीच्या ‘फेस ऑथेंटिकेशन’ (Face Authentication) सुविधेचा विस्तार आता वैयक्तिक लाभार्थी कामांसाठीही करण्याचा निर्णय दि ३० मार्च २०२६ पासून घेण्यात आला आहे. करिता आपल्या जिल्हयांच्या स्तरावरून NMMS अॅपद्वारे उपस्थितीसाठी ‘फेस ऑथेंटिकेशन’ करतांना पत्रात नमूद मुदयांप्रमाणे खालील प्रमाणे खबरदारी घेण्यात यावी : (MGNREGA Face Scan)
१) जिल्हास्तरावरील मेट्स, ग्रामरोजगार सेवक तसेच ग्रामपंचायतस्तरावरील कर्मचारी यांना पुरेसे प्रशिक्षण देण्यात यावे.
२) ‘फेस ऑथेंटिकेशन’ची (Face Authentication) सुरळीत अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी, सर्व सक्रिय कामगारांचे e-KYC पूर्ण करण्याची प्रक्रिया गतिमान करावी.
३) क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना सवलतीच्या तरतुदींबाबत योग्य प्रशिक्षण दिले जावे जेणेकरून कोणताही पात्र मजूर रोजगारापासून वंचित राहणार नाही.
४) राज्य स्तरावर व जिल्हास्तरावर अंमलबजावणीचे संनियंत्रण करणे गरजेचे आहे.
५) उक्त कामाला प्राधान्य दयावे. MGNREGA Face Scan
तर, वरील प्रमाणे सूचना सर्व विभागांना देण्यात आल्या आहेत. MGNREGA Face Scan

* महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती प्राप्त, परंतु बिल अपलोड प्रलंबित | जिल्हा निहाय यादी
* अनुदानित रासायनिक खतांचे वाटप आता ‘फार्मर आयडी’ वरच होणार
* शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता
* महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वरील अनुदान आता आधार संलग्न खात्या मध्ये जमा होणार
* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026
* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक?
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
