Pik Vima Update : खरीप व रब्बी हंगाम 2023-24 राज्य हिस्सा विमा हफ्ता निधि कंपनीला वितरित करण्याचा GR आला | राज्यातील शेतकर्यांचा विमा मिळण्याचा मार्ग मोकळा
Pik Vima Update : राज्यामध्ये सन 2023 पासून सर्वसमावेशक पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. तर, या योजना अंतर्गत राज्य हिस्साची रक्कम ही विमा हफ्ता साठी कंपनीला देणे बाकी होते तर आता राज्य शासनाने खरीप २०२३ अंतर्गत उर्वरीत राज्य हिस्सा विमा हप्त्यापोटी रक्कम रु.३०३,७०,२०,८४८/- इतका निधी योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित केला आहे.
Pik Vima Update
तसेच, शासनाने रब्बी हंगाम २०२३-२४ साठी पिक विमा हप्त्यापोटी उर्वरीत राज्य हिस्सा अनुदान रक्कम रु. ७३३,५७,७३,८७१/- इतकी रक्कम योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या पिक विमा कंपन्यांना वितरीत करण्याबाबत देखील शासन निर्णय निर्गमित केला आहे. (Pik Vima Update)
तर, आता राज्यातील ज्या महसूल मंडळांमध्ये पीक कापणी प्रयोगा नुसार उत्पन्न मध्ये घट येऊन मंडळ नुकसान भरपाई साठी पात्र आहेत अशा मंडळातील शेतकर्यांना ही रक्कम वितरित करण्यात येईल. तसेच, ज्या शेतकर्यांनी खरीप आणि रब्बी हंगाम मध्ये पीक विमा कंपनीला पीक नुकसानीच्या वैयक्तिक तक्रारी दाखल केल्या होत्या त्या शेतकर्यांना देखील आता नुकसान भरपाई देण्यात येईल. (Pik Vima Update)
#crop_insurance, pik_vima, crop_insurance_fund_disbursement, pik_vima_update, kharip_pik_vima, rabbi_pik_vima
* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज
* महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा संदर्भात अत्यंत महत्वाची सूचना
* सोयाबीन पिवळे पडतेय? मग असे करा एकात्मिक व्यवस्थापन | सोयाबीन पिवळे पडणे (क्लोरोसिस)
* पीक पेरा खरीप 2024 PDF डाऊनलोड करा | पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf | Pik pera form pdf format
* महाडीबीटी तुषार, ठिबक लॉटरी यादी डाऊनलोड करा | जून 2024 सोडत यादी