PoCRA News: शेतकर्यांना अनुदान वितरण करण्यासाठी 61.88 कोटी रुपये मंजूर | शासन निर्णय नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प | या शेतकर्यांना लवकरच मिळणार अनुदान
PoCRA News: नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA News) महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्यात 5142 गावांसाठी 4000 कोटी रुपयांच्या प्रकल्पाला जागतिक बँकेने मदत केली होती. या योजनेंतर्गत सध्या 15 जिल्ह्यांतील गावांसाठी टप्प्याटप्याने शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. यासाठी आत्तापर्यंत तीन हजार 100 कोटींच्या वर निधी वितरित करण्यात आला आहे.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) PoCRA News अंतर्गत वैयक्तिक घटकासह शेतकरी उत्पादक कंपन्या आणि गटासाठी विविध योजनांवर अनुदान वितरित करण्यात येते. आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक लाभाचे घटक वृक्षारोपण, पॉलिहाउस, फळबाग लागवड, शेडनेट हाउस, शेडनेटसह फ्लॉवर, रेशीम, मधमाशी पालन, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, भाजीपाला लागवड, इतर कृषी आधारित उद्योग, गांडूळ खत युनिट, नाडेप कंपोस्ट, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन युनिट मिळते तसेच शेततळे, ठिबक संच, विहिरी, पंप संचासाठी अनुदान देण्यात येते.
परंतु, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) PoCRA News अंतर्गत असलेल्या गावांमध्ये काही दिवसांपासून नवीन अर्ज हे बंद करण्यात आले होते आणि त्यामुळे काही शेतकर्यांच्या मनात संभ्रम होता की त्यांनी खरेदी केलेल्या घटकाचे अनुदान त्यांना मिळणार की नाही? परंतु ज्या शेतकरी बांधवांचे चालू आर्थिक वर्षामध्ये अनुदान मिळण्याचे बाकी होते त्यांचे अनुदान हे आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. कारण, शासनाने दिनांक 14 जून 2023 रोजी शासन निर्णयाद्वारे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) PoCRA News आर्थिक वर्ष 2023-24 साठी एकूण 88.40 कोटी निधि उपलब्ध करून दिला आहे.
मंजूर केलेल्या एकूण निधि मधील रु. 61.88 कोटी रुपये हे शेतकर्यांच्या प्रलंबित देयके/अनुदान अदा करण्यासाठी देण्यात आला असून शिल्लक 26.52 कोटी रुपये हे प्रशासकीय खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत.
कोणत्या शेतकर्यांना मिळणार अनुदान?
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) PoCRA प्रकल्प अंतर्गत ज्या गावातील शेतकर्यांचे मागील वर्ष म्हणजे 2022-23 आणि चालू वर्ष 2023-24 मध्ये अमलबजावणी केलेला घटक/बाब किंवा खरेदी केलेले तुषार/ठिबक संच याचे अर्ज हे अनुदान वितरण करिता प्रलंबित होते त्या सर्व शेतकर्यांना आता लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान रक्कम ही वर्ग करण्यात येणार आहे.
शासन निर्णय
अधिक वाचा :
* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध
* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली
* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …