Precautions before Buying Seeds: बाजारातून बियाणे खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी | खरीप हंगाम 2023 करिता महत्वाच्या सूचना

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Precautions before Buying Seeds: खरीप हंगाम 2023 मध्ये राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बी-बियाणे, खतांचा पुरवठा वेळेत होण्यासाठी अनेक उपाययोजना कृषि विभागामार्फत केल्या जातात. उत्पादन वाढीसाठी लागणाऱ्या विविध निविष्ठांच्या दर्जास अनन्यसाधारण महत्त्व असते. बियाणांमुळे उत्पादनात 20-25 टक्क्यांनी वाढ होते. तर खते पिकांना पोषकतत्वांचा योग्य पुरवठा करण्याची महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगामात बियाणे, खते व किटकनाशके खरेदी करताना काय काळजी घ्यावी याविषयी माहिती या लेखा मध्ये दिली आहे.

Precautions before Buying Seeds

 

बियाणे खरेदी करताना बियाण्याच्या बॅगवरील खूण चिट्ठी अगोदर तपासून घ्यावी. त्यावर खालील माहितीची खात्री केल्यानंतरच बियाणे खरेदी करावे. त्यामध्ये प्रामुख्याने पिकाचे नाव, जाती आणि प्रकार, बीज परीक्षणाची तारीख, बियाण्याची उगवणक्षमता, भौतिकशुद्धता, बियाण्याचे चाचणीची तारीख, बियाण्याचा वर्ग इत्यादी काळजीपूर्वक वाचावे प्रमाणित बियाण्याच्या खूण चिट्ठीवर अधिकाऱ्याची सही असल्याची खात्री करून घ्यावी. याशिवाय बियाण्यास कीड किवा रोग प्रतिबंधक कीटकनाशकाची प्रक्रिया केली असल्यास त्याचा उल्लेख आणि नावे टॅगवर असावीत.

 

परवानाधारक विक्रेत्याकडूनच बियाण्याची खरेदी करतानाही प्रामुख्याने बीज प्रमाणीकरण यंत्रणेने प्रमाणित केलेले बियाणे खरेदी करण्यास प्राधान्य द्यावे. टॅगवरील सर्व माहिती वाचून त्याविषयी खात्री झाल्यानंतर शेतकऱ्यांनी विक्रेत्याकडून बियाणे खरेदी करावे. त्यांच्याकडून बियाणे खरेदीचे पक्के बिल घावे. या बिलावर बियाण्याचे पीक आणि वाण तसेच गट क्रमांक, बियाण्याचे खरेदीची तारीख लिहिल्याची खात्री करून घ्यावी. मुदत बाह्य तसेच पॅकिंग फोडलेले बियाणे खरेदी करू नये. भविष्यात जर बियाण्यात काही दोष आढळला तर तक्रार करताना या सर्व गोष्टी उपयोगी पडतात. त्याशिवाय तक्रार ग्राह्य मानली जात नाही. Precautions before Buying Seeds

 

खरेदी केलेले बियाणे वापरण्यापूर्वी पिशवीच्या खालच्या बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे. बॅगवरील टॅग न काढता, रिकामी पिशवी आणि त्यामध्ये बियाण्याचा थोडासा नमुना शिल्लक ठेवून खरेदी केलेली पावती जपून ठेवावी. पेरणी करताना शक्यतो दोन वेगवेगळ्या लॉट चे बियाणे एकत्र करून पेरणी करू नये. जमिनीत योग्य ओलावा असताना च पेरणी करावी. पेरणी केलेली तारीख नोंदणी करून ठेवावी. Precautions before Buying Seeds पेरणीनंतर ४ ते ७ दिवसांत बियाण्याची उगवण झालेली दिसून येते.

 

पेरणीनंतर खूण चिट्ठीवरील प्रमाणापेक्षा उगवण कमी झाल्यास अथवा पिकात फार मोठ्या प्रमाणात भेसळ असल्यास बियाणे निरीक्षकाकडे लेखी तक्रार करावी, बियाण्याची उगवणक्षमता कमी असल्यास संबंधित विक्रेता व बियाणे उत्पादक कंपनी यांच्यावर बियाणे कायदा १९६६ मधील कलम १० नुसार कायदेशीर कारवाई होऊ शकते, बियाण्याविषयी काही तक्रार असल्यास जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तालुका कृषी विकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार द्यावी. Precautions before Buying Seeds कमी दर्जाच्या बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले असल्यास जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवून नुकसान भरपाई मागता येते.

 

अधिक वाचा :

* कृषि विद्यापीठ मध्ये जिवाणू खते विक्री साठी उपलब्ध

* मध्यवर्ती रोपवाटिका फळझाडे (कलमे) विक्री सुरू झाली

* कुसुम सोलर पंप अर्ज करा फक्त रु. 15/- मध्ये …

* फळबाग सोडत यादी जून 2023

error: Content is protected !!