Posted in

Shaktipeeth Expressway : शक्तीपीठ महामार्ग सुधारित आखणीस मान्यता | शासन निर्णय ०१ एप्रिल, २०२६ | दिग्रज, वर्धा ते बांदा, सावंतवाडी

Shaktipeeth expressway
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Shaktipeeth Expressway : दि.०७.०२.२०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये नागपूर गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्ग (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या ८०२.५९२ कि.मी लांबीच्या आखणीस मान्यता देण्यात आली होती. सदर आखणीनुसार महामार्गासाठी महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५ नुसार भूसंपादन करण्याच्या अनुषंगाने प्रसिध्द केलेली प्रारंभिक अधिसूचना कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, करवीर, हातकणंगले, कागल, भूदरगड, आजरा तालुक्यातील मंजूर आखणीसाठी दि.१५.१०.२०२४ रोजीच्या अधिसूचनेन्वये रद्द करण्यात आली.

 

तद्नंतर दि.२८.०८.२०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये पवनार ते सांगली दरम्यानची आखणी कायम ठेवण्यास मान्यता देऊन उर्वरित आखणीचे उपलब्ध सर्व पर्याय व संभाव्य पर्याय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने तपासून शासनास सादर करण्याचे निर्देशित केलेले होते. Shaktipeeth Expressway

 

संबंधित मा. मंत्री व मा. लोकप्रतिनिधी यांचेशी चर्चा करून व महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मार्गदर्शक तत्वांना (इंडियन रोड काँग्रेस विशेष पब्लिकेशन क्र. १९:२०२० च्या मूल्यांकन मॅट्रीक्स) अनुसरुन प्रत्यक्ष स्थळ पाहणीनुसार विविध पर्यायी आखणींचा अभ्यास करुन तुलनात्मक दृष्टया सर्वाधिक सुयोग्य अशी सुधारीत आखणी अंतिम करुन प्रस्तावित केलेली आहे. सदर प्रस्तावानुसार महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातुर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग या १३ जिल्ह्यांतून, ४० तालुक्यांमधून जात असून सदर महामार्गामुळे महाराष्ट्रातील प्रमुख शक्तीपीठे माहूर, तूळजापूर, कोल्हापूर यांचेसह २१ धार्मिक स्थळे जोडली जाणार आहेत. सदर महामार्गामुळे नागपूर ते गोवा हा सद्यःस्थितीतील १८ तासांचा प्रवास साधारणतः ८ तासावर येणे अपेक्षित आहे. Shaktipeeth Expressway

 

पवनार, जि. वर्धा ते पत्रादेवी, जि. सिंधुदुर्ग या महाराष्ट्र गोवा शिघ्रसंचार द्रुतगती महामार्गाची (महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग) सुधारीत आखणी अंतिम करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याअनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे शासन निर्णय दिनांक ०१ एप्रिल, २०२६ घेण्यात आला आहे. Shaktipeeth Expressway

 

मूळ मंजूर आखणीपैकी वर्धा, यवतमाळ, बीड व लातुर या जिल्ह्यांमधील आखणी कायम ठेवून नांदेड, हिंगोली, परभणी, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील मूळ मंजूर आखणीमध्ये सुधारणा करुन व सातारा जिल्ह्यामधील आखणी नव्याने अंतर्भूत करुन महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग दिग्रज, ता.जि. वर्धा ते बांदा, ता. सांवतवाडी, जि. सिंधुदुर्ग पर्यंत (साखळी क्र. कि.मी.०.००० ते कि.मी. ८५६.७६५) सुधारीत आखणीस मान्यता देण्यात आली आहे.

 

शासन निर्णय : येथे पहा 

 

 

हे पण पहा :

* मुख्यमंत्री ग्रामीण पशूधन उद्योजकता योजना 2026 | अनुदान, पात्रता, अर्ज प्रक्रिया सविस्तर माहिती पहा

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

error: Content is protected !!