VNMKV Rabi Season 2024 : कृषि विद्यापीठात रब्बी बियाणे विक्रीस सुरुवात | असे आहेत बॅग चे दर?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
3.7/5 - (3 votes)

Vnmkv Rabi Season 2024 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या रब्बी पिकांच्या वाणांचे बियाणे विक्रीचा शुभारंभ दिनांक 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आयोजित रब्बी पीक परीसंवादापासून होणार आहे.

 

Vnmkv Rabi Season 2024

 

यामध्ये ज्वारीचा परभणी शक्ती, सुपरमोती, परभणी मोती, परभणी ज्योती हे वाण विक्रीस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रत्येक वाणाची बॅग 4 किलो ची असून प्रतिबॅगचा दर 500 रुपये असा राहणार आहे. 

 

हूरड्याचा परभणी वसंत हा वाण 1 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध असून प्रति बॅग 150 रुपये दर आहे. हरभरा वाण बीडीएनजीके 798, बीडीएनजी 797 ,फुले विक्रम हे वाण उपलब्ध आहेत,  दहा किलोची बॅगची पॅकिंग असून  798 या वाणाचा दर 1000 रुपये तर हरभराच्या इतर वाणाच दर 900 रुपये प्रति बॅग असा आहे.  (Vnmkv Rabi Season 2024)

 

 

जवसाचा एलएसएल 93 हा वान उपलब्ध असून 5 किलोची बॅग 650 रुपये आणि दोन किलो ची बॅग 260 रुपये दरानुसार उपलब्ध आहे.  (Vnmkv Rabi Season 2024)

 

 

करडईची पीबीएनएस 154 उपलब्ध असून 5 किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध आहेत. या पाच किलोच्या बॅगचा दर 550 रुपये असा आहे.  गहू या पिकाची वाण एन आय ए डब्ल्यू १९९४,  उपलब्ध असून बॅग पॅकिंग 40 किलोची आहे याचा दर 2000 रुपये प्रति बॅग असा आहे.  याप्रमाणे एकूण 394 क्विंटल बियाणे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना खरेदीसाठी विद्यापीठाने उपलब्ध करून दिलेली आहे.

 

 

बियाणे खरेदी करण्यासाठी कोठे भेट द्यावी? (Vnmkv Rabi Season 2024)

 

वरील बियाणे हे खरेदी करण्यासाठी आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील बीज प्रक्रिया केंद्र या ठिकाणी भेट द्यावी. 

 

 

विक्री साठी उपलब्ध असलेले वाण?

 

Vnmkv Rabi Season 2024
Vnmkv Rabi Season 2024

 

 

हे पण पहा :

 

* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?

* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू

* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू

* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे

* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…

* सोयाबीन आणि कापूस अनुदान पोर्टल सुरू | असे पहा आपले अनुदान स्टेटस

* “या” तारखेपासून शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा होणार कापूस व सोयाबीन अनुदान

* माझी लाडकी बहीण योजना ऑनलाइन अर्ज सुरू .. 5 मिनिटांत ऑनलाइन अर्ज

 

error: Content is protected !!