MahaDBT SCAGRI eKYC : अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
MahaDBT SCAGRI eKYC : राज्यामध्ये कापूस व सोयाबीन शेतक-यांना दिलासा देण्यासाठी खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतक-यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टरी ५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणा करण्यात आली होती त्यानुसार शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आला आहे. आणि अनुदान वितरण साठी पोर्टल तयार करण्यात येऊन वितरणाची कार्यवाही सुरू आहे.
त्यानुसार कृषि आयुक्तालया मार्फत ई पीक पाहणी केलेल्या शेतकर्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. परंतु, या यादी मध्ये पीक पाहणी केलेल्या काही शेतकर्यांची देखील नावे दिसत नव्हती. त्यामुळे आता ई पीक पाहणी एवजी आता सातबारा वरती खरीप हंगाम 2023 मधील सोयाबीन व कापूस पिकाची नोंद असेल तर आता त्या शेतकर्यांना अनुदान मिळण्यासाठी पात्र करण्यात येणार आहे. (MahaDBT SCAGRI eKYC)
राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन २०२३ च्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी अँप/पोर्टलट्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे असे नोंदणीकृत शेतकरीच अर्थसहाय्याकरीता पात्र राहणार आहेत आणि ई-पीक पाहणी अँप/पोर्टल वर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्याप्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य अनुज्ञेय राहील. (MahaDBT SCAGRI eKYC)
तर, हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकर्यांना ekyc करावे लागणार आहे. तर आपण खालील दिलेल्या पद्धतीने आपली ekyc करू शकता.
कोणाला करावी लागणार ekyc? (MahaDBT SCAGRI eKYC)
जे शेतकरी नमो शेतकरी सन्मान निधि योजना अंतर्गत पात्र आहेत त्यांना ekyc करण्याची आवश्यकता नाही तर त्यांची ekyc अगोदरच झालेली आहे. फक्त जे शेतकरी नमो योजना मध्ये नोंदणी केलेले नाहीत त्यांना ekyc करावी लागणार आहे.
सोयाबीन कापूस अनुदान साठी ज्या शेतकर्यांना ekyc करावी लागणार आहे त्यांची यादी ही कृषि विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल. आपण ही यादी आपल्या तालुक्यातील कृषि विभागाशी संपर्क करून प्राप्त करून घेऊ शकता.
Ekyc कशी करावी?
eKYC करण्यासाठी आपण आपल्या जवळील महा ई सेवा केंद्र वरती भेट द्या किंवा आपण खाली दिलेल्या स्टेप्स वरुण देखील आपली ekyc पूर्ण करू शकता. (MahaDBT SCAGRI eKYC)
सोयाबीन कापूस अनुदान साठी खालील पद्धतीने ekyc करावी.
स्टेप 1 : प्रथम आपण खालील दिलेल्या लिंक वरती भेट द्यावी
सोयाबीन कापूस अनुदान ekyc पोर्टल लिंक
स्टेप 2 : Disbursement Status वरती क्लिक करावे
स्टेप 3 : पुढे आपला आधार क्रमांक आणि कॅप्त्चा टाकून OTP वर टिक करावे आणि Get Aadhar OTP वरती क्लिक करावे
स्टेप 4 : त्यानंतर आपल्या आधार नोंदनिकृत मोबाइल वरती OTP पाठविला जाईल तो टाकून Get Data वर क्लिक करावे.
त्यानंतर आपण OTP टाकल्यानंतर तो OTP जुळळ्यास आपली ekyc पूर्ण झाली असे समजावे.
तर, आपण वरील प्रमाणे आपली ekyc करू शकता.
सोयाबीन कापूस अनुदान ekyc पोर्टल लिंक : येथे भेट द्या
ekyc माहिती पुस्तक : डाऊनलोड करा
* महाडीबीटी कापूस साठवणूक बॅग सोडत यादी आली | तुमची निवड झाली का?
* अशी करा सोयाबीन कापूस अनुदान ई-केवायसी? Soyabin Kapus anudan ekyc
* बॅटरी फवारणी पंप लॉटरी यादी पहा … तुमची निवड झाली का?
* मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू
* महामेष योजना ऑनलाइन अर्ज सुरू
* अनुदान यादीत नाव नाही परंतु सात बारा वर नोंद आहे
* पिकाचे नुकसान झाले असल्यास कंपनीकडे अशी नोंदवा तक्रार…