PM Kisan: पीएम किसान योजनेचा 14 वा हफ्ता लवकरच शेतकर्यांच्या खात्यावर होणार जमा | 14th Installment
PM Kisan : देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाने देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये आणखी रु. 6000/- ची मदत देणार आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील (PM KISAN) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळणार आहेत.
तर, शेतकरी बांधवानो आता दिनांक 27 जुलै 2023 रोजी पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 व्या हाफत्याचे शेतकर्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहे. तर, सर्व पात्र शेतकर्यांना या दिवशी रु.2000/- हे त्यांच्या खात्यामध्ये वितरण करण्यात येणार आहेत.
तर, हा हफ्ता सर्व ekyc केलेल्या, आधार बँक खाते संलग्न असलेल्या आणि जमीन पडताळणी झालेल्या सर्व शेतकर्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.
आपले पी एम किसान चे स्टेटस चेक करा?
खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आपला नोंदणी क्रमांक टाकावा आणि Get Data वरती क्लिक करावे त्यानंतर आपल्याला स्टेटस दाखविले जाईल यामध्ये तुमचे ekyc, आधार बँक खाते लिंक असले बाबत तसेच जमीन पडताळणी बाबतचे स्टेटस दाखविले जाईल. आणि जर यामध्ये काही त्रुटि असेल ती तुम्हाला पूर्ण करावी लागेल अन्यथा आपल्याला लाभ मिळणार नाही.
स्टेटस चेक करण्यासाठी : येथे भेट द्या
नोंदणी क्रमांक कसा पाहावा?
आपल्याकडे जर नोंदणी क्रमांक नसेल तर खाली दिलेल्या लिंक वर जाऊन आधार नंबर टाकावा आणि आलेला OTP टाकून सबमीट केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक दिसेल.
नोंदणी क्रमांक पाहण्यासाठी : येथे भेट द्या
PM KISAN लाभार्थी यादी?
पीएम किसान योजनेची लाभार्थी यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या.
लाभार्थी यादी पाहण्यासाठी : येथे भेट द्या
अधिक वाचा :
* बियाणे, खते, कीटकनाशक तक्रारी व्हॉटसअॅप वर करता येणार
* शंखि गोगलगाय नियंत्रण साठी उपाययोजना
* पीक पेरा स्वयंघोषणा पत्र pdf डाऊनलोड करा
* पीक विमा भरण्यासाठी 31 जुलै शेवटची मुदत
* एक रुपयात पीक विमा महत्वाची अपडेट पहा