नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8 वा हप्ता दिनांक 25 मार्च 2026 रोजी राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. या हप्त्यामुळे राज्यातील तब्बल 89 लाख 74 हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या आर्थिक बळकटीसाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.
या हप्त्याअंतर्गत एकूण रु. 1798 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. यामुळे पारदर्शकता वाढून शेतकऱ्यांना कोणत्याही अडथळ्याविना त्वरित लाभ मिळत आहे.
राज्यातील शेतकर्यांना केंद्र सरकारच्या पीएम किसान योजने च्या निकषा नुसार आर्थिक मदत करण्यासाठी (MahaDBT NSMNY Beneficiary Status) राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधि योजना राज्यामध्ये राबविण्याचे ठरवले आहे. त्यानुसार या योजनेचे नवीन संकेतस्थळ तयार करण्यात आले असून या संकेतस्थळवरती लाभार्थी आपले स्टेटस चेक करू शकतील.
तुमचे पैसे आले की नाही असे करा चेक (MahaDBT NSMNY Beneficiary Status)
नमो शेतकरी महासन्मान निधि योजना लाभार्थी स्टेटस पहाण्यासाठी आपण खालील दिलेल्या पद्धतीने पाहू शकता
1. प्रथमतः आपण खाली दिलेल्या लाभार्थी सद्यस्थिती / Beneficiary Status या पर्याय वरती क्लिक करा
Beneficiary Status / लाभार्थी स्टेटस चेक करा
2. पुढे आपल्यासमोर खालील प्रमाणे पेज दिसेल

3. या ठिकाणी आपण आपला आधार क्रमांक/मोबाइल क्रमांक किंवा आपला नोंदणी क्रमांक टाकून स्टेटस चेक करू शकता

4. आपला आधार क्रमांक/मोबाइल क्रमांक टाकावा आणि कॅप्त्चा कोड टाकून Get Aadhar OTP वरती क्लिक करावे, व आलेला OTP प्रविष्ट करावा.
5. पुढे आपल्याला आपले नाव, गावं, आणि नमो शेतकरी महासन्मान निधि योजना च्या हाफत्यांचे स्टेटस दाखविले जाईल.
MahaDBT NSMNY Beneficiary Status
लाभार्थी हफ्ता स्टेटस चेक करण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्या :
* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्यांना अनुदान मिळणार
* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान
* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?
* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा
* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना
* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ
* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
