Sugarcane Harvester MahaDBT Farmer Application | ऊस तोडणी यंत्र ऑनलाइन अर्ज सुरू …लवकर या पद्धतीने करा अर्ज
Sugarcane Harvester MahaDBT Farmer : शेतकरी बांधवानो आता महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व इच्छुक शेतकर्यांना उस तोडणी यंत्र खरेदी करण्यास अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. तर कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे शेतकर्यांना उस तोडणी यंत्रास किती अनुदान देण्यात येणार आणि यासाठी कोठे आणि कसा अर्ज करायचा हे आपण पुढील प्रमाणे जाणून घेऊयात.
ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) अनुदान
अनुदानाची रक्कम : किमतीच्या 40% किंवा जास्तीत जास्त 35 लाख रुपये असेल
अमलबजावणी विभाग : कृषि विभाग
कृषि विभाग योजना : राष्ट्रीय कृषी विकास योजना RKVY
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन Online Application
अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ/वेबसाइट : महाडीबीटी शेतकरी पोर्टल MahaDBT Farmer
Sugarcane Harvester MahaDBT Farmer
ऊस तोडणी यंत्र (Sugarcane Harvester) ऑनलाइन अर्ज स्टेप्स
स्टेप 1: महाडीबीटी शेतकरी mahadbtfarmer योजना पोर्टलवर जावे
महाडीबीटी शेतकरी पोर्टल MahaDBT Farmer : येथे भेट द्या
स्टेप 2: महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी लॉगिन करावे (mahadbt farmer login)
स्टेप 3: अर्ज करा हा पर्याय निवडावा
स्टेप 4: कृषि यांत्रिकीकरण ही बाब निवडावी
स्टेप 5: मुख्य घटक, तपशील, एच पी शेणी निवडावी
मुख्य घटक : कृषि यंत्र औजाराच्या खरेदी साठी अर्थसहाय्य हा निवडावा
तपशील : ऊस तोडणी यंत्र निवडावा
व्हील ड्राइव आणि HP खालील प्रमाणे निवडावा
स्टेप 6: अर्ज जतन करावा
स्टेप 7: मेनू वर जा हा पर्याय निवडून मुख्य पृष्ठ वरती यावे
स्टेप 8: अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा
स्टेप 9: प्राधान्यक्रम देऊन अर्ज सादर करा या बटणावर क्लिक करावे आणि शुल्क भरून अर्ज सादर करावा
वरील प्रमाणे आपण महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर Sugarcane Harvester MahaDBT Farmer ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. Sugarcane Harvester MahaDBT Farmer अर्ज सादर केल्यानंतर आपला अर्ज हा ऑनलाइन सोडत साठि पाठविल्या जाईल आणि नंतर सोडत मध्ये निवड झाल्यानंतर आपल्याला कळविले जाईल.