Posted in

Crop insurance compensation : खरीप हंगाम पीक विमा 17500/- हेक्टरी मिळणार का? पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा…

Crop insurance compensation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
4.2/5 - (5 votes)

Crop insurance compensation : खरीप हंगाम २०२५ च्या पीक नुकसानीपोटी शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. कारण पीक कापणी प्रयोग आणि तांत्रिक उत्पादकतेची माहिती ही राज्याने केंद्र सरकारला दिली आहे.

 

 

केंद्राच्या पोर्टलवर माहिती अपलोड करण्याचे काम सुरू असून, जानेवारी महिन्यातच सोयाबीनसह प्रमुख पिकांसाठी शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळेल असा अंदाज आहे. परंतु कापूस आणि तुरीच्या विम्यासाठी एप्रिल महिना उजाडू शकतो, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली आहे. Crop insurance compensation

 

 

राज्य सरकारने यंदा खरीप आणि रब्बी हंगामात सुधारित पीकविमा योजना राबवली. सुधारित योजनेत पेरणीच न होणे, हंगामातील प्रतिकूल परिस्थिती, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान हे विमा भरपाईचे ट्रिगर काढून टाकले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात पिकांचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले. पण यंदा पंचनामे न करता पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाच्या आधारे भरपाई मिळणार आहे. त्यामुळे विमा भरपाई गेल्या वर्षीपेक्षा कमीच मिळणार आहे. Crop insurance compensation

 

 

खरिपातील सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी, मका या पिकांचे पीक कापणी प्रयोग पूर्ण झाले आहेत आणि त्याची माहिती राज्याच्या कृषी विभागाने केंद्राकडे पाठवली आहे. तांत्रिक उत्पादकतेचीही माहिती देखील दिली आहे. म्हणजेच खरिपातील पिकांच्या विमा भरपाईसाठी आवश्यक सर्व आवश्यक माहिती राज्याकडून केंद्राला देण्यात आली आहे.

 

पुढील काही दिवसांत ही माहिती केंद्राच्या पोर्टलवर अपलोड करण्याचे काम पूर्ण होईल आणि शेतकऱ्यांना देय विमा भरपाईची रक्कम निश्चित होईल. त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात लगेच विमा भरपाई जमा करण्यात येईल. ही सर्व प्रक्रिया जानेवारी महिन्यातच पूर्ण होईल, असे सूत्रांनी सांगितले. Crop insurance compensation

 

धाराशिवमध्ये कंपनीचा आक्षेप (Crop insurance compensation)

 

धाराशिव जिल्ह्यातील पीक कापणी प्रयोगातून आलेली उत्पादकता तांत्रिक उत्पादकतेच्या तुलनेत खूपच कमी आहे, तसेच पीक कापणी प्रयोग चुकीच्या पध्दतीने करण्यात आल्याचा आक्षेप घेत विमा कंपनीने अपील केले आहे. या अपिलावर केंद्राच्या पातळीवरच तोडगा निघण्याची शक्यता आहे.

 

 

सर्वांना हेक्टरी १७५०० रुपये भरपाई मिळणार का?

 

मुख्यमंत्री यांनी अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी १७ हजार ५०० रुपये विमा भरपाई मिळेल, असे सांगितले होते. परंतु पीक कापणी प्रयोगातून आलेले उत्पादन पाहता शेतकऱ्यांना एवढी भरपाई मिळण्याची शक्यता दिसत नाही. काही शेतकऱ्यांचे वैयक्तिक पातळीवर मोठे नुकसान झाले असले तरी यंदा वैयक्तिक पंचनामे झाले नाहीत. मंडल स्तरावर पीक कापणी प्रयोग होऊन महसूल मंडळ पातळीवर नुकसानीची पातळी ठरणार आहे. त्यानुसार विमा भरपाई मिळणार आहे.

 

 

error: Content is protected !!