PM Kisan : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.१३ मार्च) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वितरित केला. पंतप्रधान मोदी यांनी आसामच्या गुवाहाटी येथून देशातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८,६४० कोटी रुपये जमा केले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून २ हजार रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सुमारे १९,४८० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचेही उद्घाटन करत ते राष्ट्राला समर्पित केले. PM Kisan
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ लाख ९ हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसाह्य शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. आता या योजेनचा २२वा हप्ता जारी झाल्यामुळे एकूण वितरित करण्यात आलेली रक्कम ४ लाख २७ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे.PM Kisan
“ज्या पात्र शेतकऱ्यांनी ई- केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केली असतील, तर त्यांना हा २ हजार रुपयांचा हप्ता मिळणार आहे. या योजनेअंतर्गत, अर्थसाह्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जाते. या अंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमी करण्यात येते.”
पीएम किसान स्टेटस कसे तपासावे? PM Kisan
>> पहिल्यादा पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
>> तुम्ही तिथे उजव्या बाजूला असलेल्या लॉगिन पर्यायावर क्लिक करा.
>> त्यानंतर लॉगिन तपशीलासह कॅप्चा कोड नमूद करा.
>> तुम्हाला फार्मर कॉर्नर (Farmer Corner) पर्याय दिसून येईल, त्यावर क्लिक करावे.
>> त्यानंतर लाभार्थी स्टेटस (Beneficiary Status) वर क्लिक करा.
>> त्यावर तुमचे राज्य, गाव, जिल्हा निवडा.
>> त्यानंतर तुम्हाला एक स्टेटस दिसेल, ज्यावर तुमच्या खात्यात पैसे कधी येतील, सांगितले जाईल. PM Kisan
