Posted in

Havaman andaj : राज्यातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज

Havaman andaj
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Havaman andaj राज्यातील काही भागात उद्यापासून पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी आज उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे.

 

राज्यातील अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात उद्यापासून तीन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. तर सिंधुदूर्ग, जळगाव, नाशिक जिल्ह्यात रविवारी काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात उद्यापासून पुढील चार दिवस काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे.  Havaman andaj

 

छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात रविवारपासून तीन दिवस हलक्या पावसाचा अंदाज आहे. लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात आजपासून तर परभणी, बीड, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. Havaman andaj

 

विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, गोंदीया जिल्ह्यात उद्यापासून वादळी पावसाची शक्यता आहे. तर यवतमाळ आणि नागपूर जिल्ह्यात रविवारपासून वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  Havaman andaj

 

राज्यात एकीकडे वादळी पावसाला पोषक हवामान असून दुसरीकडे मात्र उष्णताही वाढली आहे. आज यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, अमरावती आणि अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तर कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी आज आणि उद्या उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

 

तसेच आयएमडी नुसार, राज्यातील काही भागांमध्ये 17 ते 20 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

 

हा परिणाम प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये जाणवू शकतो. 18 ते 20 मार्च दरम्यान परिस्थिती अधिक तीव्र होण्याची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.

 

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!