Posted in

VB-G RAM G अंतर्गत फळबाग योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर ‘युक्तधारा’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य | “ही” आहे नोंदणीची अंतिम तारीख 

Yuktadhara vb g ram g
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

VB-G RAM G : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत (MGNREGA) राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित भारत-ग्रामीण रोजगार व आजीविका हमी अभियान’ अंतर्गत सन २०२६-२७ मध्ये नवीन फळबाग लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाने महत्त्वाच्या सूचना जारी केल्या आहेत. (Viksit Bharat—Guarantee for Rozgar and Ajeevika Mission (Gramin) (VB—G RAM G)  )

 

यामध्ये फळबाग लागवडीसाठी आता ‘युक्तधारा’ (YuktDhara) पोर्टलवर माहिती अपलोड करणे अनिवार्य करण्यात आले असून, १५ ऑगस्ट २०२६ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे. कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, युक्तधारा पोर्टलवर माहिती अपलोड केल्याशिवाय कोणताही प्रस्ताव मंजूर केला जाणार नाही. त्यामुळे इच्छुक शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत आणि रोजगार सेवकांच्या मदतीने आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे आणि यासाठी अंतिम मुदत ही दिनांक 15 ऑगस्ट 2026 ही आहे. (VB-G RAM G)

 

नोंदणी करताना जीपीएस फोटोसह माहिती अपलोड करणे बंधनकारक?

 

फळबाग लागवडीसाठी ज्या शेताची निवड करण्यात आली आहे, त्या जागेचा जीपीएस लोकेशनसह फोटो रोजगार सेवकांच्या माध्यमातून युक्तधारा पोर्टलवर अपलोड करावा लागणार आहे.

तसेच त्यासोबत पुढील कागदपत्रेही आवश्यक असतील.

  1. शेताचा जीपीएस लोकेशनसह फोटो
  2. ग्रामपंचायतीचा ठराव
  3. संबंधित गटाचा जीपीएस फोटो
  4. इतर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे

ही सर्व माहिती निश्चित मुदतीत पोर्टलवर अपलोड करणे अनिवार्य आहे.

 

संपूर्ण मंजुरी प्रक्रिया कशी आहे? 

 

कृषी विभागाने फळबाग प्रस्ताव मंजुरीची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने खालील प्रमाणे निश्चित केली आहे.

पहिला टप्पा: रोजगार सेवक शेताचा जीपीएस फोटो आणि आवश्यक माहिती युक्तधारा पोर्टलवर अपलोड करतात.

दुसरा टप्पा: ग्रामपंचायत स्तरावर माहितीची पडताळणी केली जाते.

तिसरा टप्पा: पडताळणी पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठविला जातो.

चौथा टप्पा: पंचायत समितीकडून प्रस्ताव कृषी विभागाकडे पाठविण्यात येतो.

पाचवा टप्पा: कृषी विभागाकडून फळबाग लागवडीचे अंदाजपत्रक तयार करून पुढील मंजुरीची प्रक्रिया राबविण्यात येते.

कृषी विभागाच्या माहितीनुसार, युक्तधारा पोर्टलवर नोंदणी आणि आवश्यक माहिती अपलोड झाल्यानंतरच प्रस्तावांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे अंतिम मुदतीपूर्वी सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यास प्रस्तावांना लवकर मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

 

विलंब झाल्यास संबंधित शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू शकतात, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे आजच आपल्या गावातील रोजगार सेवक यांना भेटून आपली नोंदणी करून घ्या. (VB-G RAM G)

 

 

error: Content is protected !!
Created with ❤