Posted in

Karjamafi 2026 : कर्जमाफी ची रक्कम प्रत्यक्ष खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा | पहिल्या टप्प्यात 7000 कोटी निधी वितरणास मंजुरी.. शासन निर्णय जारी 

Karjamafi
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Karjamafi 2026 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (PAHSKY) 2026 ही योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना रु.२ लाखपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु.५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. (Karjamafi e-KYC Update Karjamafi e-KYC )

 

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात ७ हजार कोटींच्या निधी वितरणास मंजुरी दिली आहे. कर्जमुक्ती योजनेसाठी २०२६-२७ या आर्थिक वर्षामध्ये पुरवणी मागणीद्वारे २०,५५२ कोटी इतका निधी मंजूर केला होता. या निधीपैकी ७ हजार कोटी इतका निधी वितरित केला जात आहे. याबाबतचा शासन निर्णय सहकार विभागाने जारी केला आहे. (Karjamafi 2026)

 

 

सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ (कार्यक्रम) (२४३५ ०२४२), ३३ अर्थसहाय्य या लेखाशिर्षाअंतर्गत २०,५५२ कोटी इतका निधी मंजूर आहे. सद्यस्थितीत या लेखाशिर्षाखाली २०,५५१ कोटी इतका निधी शिल्लक आहे. सदर निधीपैकी 7,000 कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाने आज 30 जुलै रोजी शासन निर्णय निर्गमित करून मंजुरी दिली आहे. (Karjamafi 2026)

 

शासन निर्णय : येथे पहा 

 

 

error: Content is protected !!
Created with ❤