Posted in

Farmer Loan Waiver Helpline : कर्जमुक्ती योजनेबाबत काही अडचण असल्यास तक्रार कुठे करावी? पहा सविस्तर 

Farmer loan waiver helpline number
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Rate this post

Farmer Loan Waiver Helpline : राज्यातील शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना (PAHSKY) 2026 ही योजना सुरू केली आहे. यामध्ये कर्ज थकबाकीदार शेतकऱ्यांना रु.२ लाखपर्यंत कर्जमाफी व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रु.५० हजारपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे.

 

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी (Farm Loan Waiver) सध्या लाभार्थी शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) प्रक्रिया आता सुरु आहे. ३१ जुलै २०२६ पर्यंत राज्यातील एकूण १६ लाख ९६ हजार २०१ लाभार्थ्यापैकी ८ लाख ३३ हजार २२३ शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण पूर्ण झाली आहे. हे प्रमाण ४९.८४ टक्के इतके असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे. (Farmer Loan Waiver Helpline)

 

कर्जमुक्तीबाबत काही अडचण असल्यास तक्रार कुठे करावी?

 

कर्जमुक्ती योजना २०२६ संदर्भात तक्रार, शंका अथवा अधिक माहितीसाठी ०२२-४९१५०८०२ हा हेल्पलाइन क्रमांक देण्यात आला आहे. यावर कार्यालयीन वेळत संपर्क साधता येईल. कर्जमुक्तीची पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीत नाव नसल्यास घाबरु नका. उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्याच येणार आहेत. ग्रामपंचायत कार्यालय, बँक शाखा आणि सेवा केंद्रात माहिती उपलब्ध आहे. कोणतीही तक्रार असल्यास जिल्हास्तरीय समितीकडेही दाद मागता येईल, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.

Farmer loan waiver helpline number new

 

 

error: Content is protected !!
Created with ❤