Posted in

Havaman andaj : महाराष्ट्रातील ‘या’ भागात पावसासह गारपिटीची शक्यता | हवामान अंदाज

Havaman andaj hailstorms
5/5 - (2 votes)

Havaman andaj : आजपासून ते शुक्रवार दि.२० मार्च पर्यंतच्या या 5 दिवसात कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात विजा, वारा-वावधन, गडगडाटासह दुपारनंतर उष्णता संवहनी प्रक्रियेतून तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते, अशी माहिती जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.

 

राज्यात विशेषतः गुढी पाडव्याला,आदल्या व दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. १८, १९, आणि २० मार्च या तीन दिवशी असल्या वातावरणासह, अमरावती, अकोला, वर्धा, बुलढाणा, वाशिम, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ तसेच नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, बीड, धारशिव, लातूरसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर ह्या २० जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक जाणवते. Havaman andaj

 

गारपीटीची शक्यता Havaman andaj

 

दि.१८ मार्च रोजी अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया ह्या सहा जिल्ह्यात किरकोळ गारपीटीची शक्यताही नाकारता येत नाही. Havaman andaj

 

रब्बी हंगामातील पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवावीत. हवामानाच्या अद्ययावत अंदाजावर लक्ष ठेवून शेतीची कामे नियोजित करावीत आणि संभाव्य पाऊस व वादळी वाऱ्यांपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे. Havaman andaj

 

 

हे पण पहा :

 

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!