PM Kisan Status : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (दि.१३ मार्च) पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा २२ वा हप्ता वितरित केला. पंतप्रधान मोदी यांनी आसामच्या गुवाहाटी येथून देशातील ९.३२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८,६४० कोटी रुपये जमा केले. यामुळे गेल्या काही दिवसांपासून २ हजार रुपयांच्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ लाख ९ हजार कोटी रुपयांहून अधिक अर्थसाह्य शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. आता या योजेनचा २२वा हप्ता जारी झाल्यामुळे एकूण वितरित करण्यात आलेली रक्कम ४ लाख २७ हजार कोटी रुपयांहून अधिक झाली आहे. PM Kisan Status
ज्या पात्र शेतकऱ्यांनी ई- केवायसी (eKYC) प्रक्रिया पूर्ण केली असेल आणि या योजनेसाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्रे वेळेवर सादर केली असतील, तर त्यांना हा २ हजार रुपयांचा हप्ता मिळाला आहे. या योजनेअंतर्गत, अर्थसाह्य थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित केले जाते. या अंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण ६ हजार रुपये मिळतात. ही रक्कम दर चार महिन्यांनी २ हजार रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण (DBT) द्वारे थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमी करण्यात येते. PM Kisan Status
हप्ता न मिळाल्यास काय कराल? PM Kisan Status
>> योजनेचा हप्ता खात्यावर जमा झालेला नसल्यास शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ‘Beneficiary Status’ पर्यायातून आपली माहिती तपासावी
>> हप्ता जमा झाला नसेल, तर आधार लिंकिंग, ई-केवायसी, बँक खात्याची माहिती व जमीन नोंदणीची माहिती अद्ययावत आहे का, हे तपासणे आवश्यक आहे
>> कोणतीही त्रुटी आढळल्यास जवळच्या सेवा केंद्रात किंवा तालुका कृषी विभागाच्या कार्यालयात संपर्क साधून माहिती दुरुस्त करावी.
अॅग्रीस्टॅक’ नसणाऱ्यांकडे लक्ष
काही लाभार्थ्याकडे ‘अॅग्रीस्टॅक’ (डिजिटल शेतकरी नोंद) उपलब्ध नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांची स्वतंत्र पडताळणी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. भविष्यात योजनांचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली जमीन नोंद, आधार लिंकिंग, ई-केवायसी तसेच अॅग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
आधार लिंक, ई-केवायसी केली का?
अनेक लाभार्थ्यांची ई-केवायसी अपूर्ण असल्याने किंवा आधार क्रमांक खात्याशी जोडलेला नसल्याने त्यांचा हप्ता थांबण्याची शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीएम किसानच्या अधिकृत पोर्टलवर किंवा जवळच्या सेवा केंद्रात जाऊन आधार लिंकिंग आणि ई-केवायसी करण्याचे आवाहन केले आहे. PM Kisan Status
* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?
* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?
* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू
* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?
