Posted in

Namo Scheme Installment : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

Namo scheme installment
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

Namo Scheme Installment : देशभरात केंद्र सरकार द्वारे पीएम किसान सन्मान निधी ही योजना (Namo Shetkari Yojana) राबविल्या जात आहे. या पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत देशातील शेतकरी कुटुंबाला वर्षाला रु. 6000/- इतकी आर्थिक मदत देण्यात येत आहे आणि ही मदत दर 4 महिन्यांच्या अंतरानं म्हणजे रु. 2000 च हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येत आहे.

 

महाराष्ट्र राज्य सरकार हे देखील केंद्र सरकारच्या वार्षिक रु. 6000/- मध्ये “नमो शेतकरी महासन्मान निधी योजना” अंतर्गत रु. 6000/- ची मदत देत आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील  (Namo Shetkari Yojana) सर्व पात्र शेतकऱ्यांना वर्षाला एकून रु. 12000/- मिळत आहेत. Namo Scheme Installment

 

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचा (माहे ऑगस्ट २०२५ ते नोव्हेंबर २०२५) लाभ पात्र लाभार्थ्यांना अदा करण्यासाठी १ हजार ७७४ कोटी रुपये इतका निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत हा हफ्ता देखील वितरित होईल, अशी शक्यता शेतकरी वर्गा मध्ये होती.  परंतु, आता राज्याचे कृषिमंत्री मा. दत्तात्रय भरणे यांनी समाज माध्यमावरील पोस्टमध्ये कळविले आहे की राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पुढील आठवड्यात नमोचा आठवा हप्ता जमा होईल”, अशी माहिती दिली आहे.  Namo Scheme Installment

 

 

पुढील आठवड्यात कधी जमा होईल? Namo Scheme Installment

 

राज्यातील पात्र शेतकऱ्यांना नमोचा आठवा हप्ता गुढीपाडव्याच्या दिवशी जमा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. परंतु सलग सुट्ट्या असल्याने वितरण पुढील आठवड्यापर्यंत लांबणीवर टाकण्यात आलं आहे. त्यामुळे २३ मार्च नंतरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर नमोचा हप्ता जमा करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

कोण असेल या हफ्त्या साठी पात्र?

 

ज्या शेतकर्‍यांना पीएम किसान योजना अंतर्गत हफ्ते नियमित मिळत आहेत असे सर्व शेतकरी हे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हफ्त्यास पात्र ठरणार आहेत.

 

Namo scheme installment

 

 

हे पण पहा :

 

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

error: Content is protected !!