Posted in

Bhausaheb Fundkar Falbag Yojana : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना साठी निधि मंजूर

Bhausaheb Fundkar Falbag Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (1 vote)

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरु शकत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केलेली आहे. या योजनेची सन २०२५-२०२६ मध्ये अंमलबजावणी करण्यासाठी 104.50 कोटी रुपयांच्या निधीस प्रशासकीय मान्यता दिली. याबाबत फलोत्पादन विभागाच्या संचालकांनी निधी वितरणाकरीता प्रस्ताव सादर केले आहेत. त्यानुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गाचा निधी कृषी आयुक्तालयास वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन निर्णय आज 27 मार्च रोजी जारी करण्यात आला आहे. Bhausaheb Fundkar Falbag Yojana

 

 

या शासन निर्णय नुसार भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना २०२५-२६ मध्ये राबवण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गाचा 30 कोटी रुपयांचा निधी कृषी विभागाला उपलब्ध करुन देण्यात आला आहे.  या निधीतून सुरुवातीला सन २०२३-२४ आणि सन २०२४-२५ मधील प्रलंबित रक्कम अदा करण्यात यावी. त्यानंतर उर्वरित निधी २०२५-२६ मधील कार्यक्रम राबविण्यासाठी प्रशासकीय मान्यतेनुसार खर्च करण्यात यावा, असे शासन निर्णय मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. Bhausaheb Fundkar Falbag Yojana

 

 

आता निधि उपलब्ध झाल्यामुळे ज्या शेतकर्‍यांचे अनुदान वितरण प्रलंबित होते त्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला आहे. पुढील काही दिवसांत हे अनुदान पात्र शेतकर्‍यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे.  Bhausaheb Fundkar Falbag Yojana

 

 

शासन निर्णय : येथे पहा

 

हे पण पहा :

 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

* नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता पुढील आठवड्यात | कृषिमंत्री यांची घोषणा

* महिला बचत गटांना मिळणार 24 लाख रुपये अनुदान | कृषी औजारे बँक स्थापना

* रब्बी हंगामातील ई-पीक पाहणी साठी 31 मार्च 2026 पर्यन्त मुदतवाढ

* पीएम किसानचा हप्ता “न” मिळाल्यास काय कराल? जाणून घ्या सविस्तर

* नमो शेतकरी योजनेचा 8 व्या हफ्त्याचा निधी आला …. लवकरच मिळणार हफ्ता?

* हमीभावाने हरभरा विकायचा असेल तर मग या अटी बंधनकारक?

* हरभरा शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आजपासून नाफेड नोंदणी व खरेदी सुरू

* पीएम किसान योजनेचा हफ्ता वितरित….तुम्हाला मिळाला का हफ्ता?

 

error: Content is protected !!