Posted in

Livestock Compensation : राज्यात माहे जून ते सप्टेबर २०२५ मध्ये अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित पशुधन, गोठा चे मदतीचे दर निश्चित

Livestock compensation
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
5/5 - (2 votes)

Livestock Compensation : माहे जून ते सप्टेबर २०२५ या कालावधीत राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली होती. अतिवृष्टी व धरणातील पाणी विसर्गामुळे गंभीर स्वरुपाची पूरपरिस्थितीमुळे पूरग्रस्त भागात पशुधन मृत्यूमुखी पडले / वाहून गेले आहेत. बाधित क्षेत्रातील पशुपालकांना विशेष मदत पॅकेज (Relief package) व सवलती जाहीर केल्या आहेत. त्यानुसार शासन निर्णयान्वये विहीत करण्यात आलेले राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाचे (NDRF) निकष शिथिल करुन सर्व मृत/बेपत्ता पशुधनास तसेच गोठयाच्या नुकसानीपोटी मदतीचे दर येथे शासन निर्णयान्वये विहित करण्यात आले आहेत. सदर मदतीचे वितरण करण्यासाठी कार्यप्रणाली / मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती. त्यानुसार पुढील शासन निर्णय निर्गमित करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. Livestock Compensation

 

माहे जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या भागातील पशुधन हानीच्या संदर्भात मदत व पुनर्वसन विभागाने येथील शासन निर्णयान्वये मदतीचे दर विहित केले आहेत. त्यानुसार पशुसंवर्धन विभागाशी संबंधित मदतीचे दर पुढीलप्रमाणे आहेत:- Livestock Compensation

 

Dar

 

उपरोक्त दराप्रमाणे देण्यात येणाऱ्या मदतीचे वितरण करण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.

 

१. महसूल व वन विभागाच्या शासन निर्णय दि. २७.०३.२०२३ मधील शिथिल करण्यात आलेले निकषः- Livestock Compensation

 

१. अल्प, अत्यल्प भूधारक तसेच भूमिहीन पशुपालकांऐवजी सर्व अपादग्रस्त पशुपालक मदतीसाठी पात्र राहतील.

२. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३ मोठ्या दुधाळ व ओढकाम करणाऱ्या मोठ्या जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व दुधाळ जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

३. प्रत्येक पशुपालकांना कमाल ६ ओढकाम करणाऱ्या लहान जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

४. प्रत्येक पशुपालकांना कमाल ३० लहान दुधाळ जनावरांऐवजी मृत/बेपत्ता असलेली सर्व जनावरे मदतीसाठी पात्र राहतील.

५. प्रत्येक पशुपालकांना कमाल १०० कुक्कुट पक्षांसाठी रु. १०,०००/- च्या मर्यादेत याऐवजी मृत/बेपत्ता

राहतील. असलेली सर्व कुक्कुटपक्षी मदतीसाठी पात्र

 

 

२. मृत/बेपत्ता पशुधनाची खातरजमा :-

 

अतिवृष्टीत/पुरात मृत पावलेल्या/वाहून गेलेल्या पशुधनाची किमान खालीलपैकी एका ठिकाणी नोंद असणे आवश्यक राहील.

  1. राष्ट्रीय डिजीटल पशुधन अभियानांतर्गत (NDLM) भारत पशुधन अॅपवर नोंदणी.
  2. २१ वी पशुगणनेतील नोंद.
  3. पशुसंवर्धन विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या नियतकालीक लसीकरणाची नोंदवहीतील नोंद/ ऑनलाईन नोंदी
  4. विमा कंपनीकडील नोंद
  5. दुध अनुदान योजनेत समाविष्ट असलेले पशुधन व त्यांचे मालक याची नोंद.

 

हे पण पहा :

 

* तुमचे पैसे आले की नाही, असे करा चेक? 

* कृषि यांत्रिकीकरण योजना साठी 150 कोटी रुपये निधि मंजूर | लवकरच शेतकर्‍यांना अनुदान मिळणार

* फवारणी साठी ड्रोन पाहिजे? | शासन देत आहे ड्रोन खरेदी साठी अनुदान

* महारेशीम अभियानाला मुदतवाढ | आता रेशीम योजनांसाठी “या” तारखेपर्यंत करू शकता अर्ज?

* सोलर पंप चालू असताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

error: Content is protected !!