Crop Insurance : प्रधानमंत्री पीक विमा योजना (PMFBY) ही केंद्र व राज्य शासनाची योजना असून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर, वादळ, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी ही योजना राबवली जाते.
या वर्षी खरीप हंगामात (Crop Insurance) पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल वर अर्ज स्वीकारण्यात येत आहेत. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ही 31 जुलै 2026 आहे. परंतु राज्यातील अद्याप बरेच शेतकरी बांधव हे पीक विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. (Crop Insurance)
कृषि विभागाकडून केंद्राचे कृषि मंत्रालयाचे सचिव यांना पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत पीक विमा भरण्यासाठी राज्यामध्ये 10 ऑगस्ट पर्यन्त मुदत वाढ देण्या साठी पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार आता राज्यातील शेतकर्यांना दिनांक 10 ऑगस्ट पर्यन्त पंतप्रधान पीक विमा योजना मध्ये सहभागी होता येईल. (Crop Insurance)
तर, आता राज्यातील शेतकरी हे 10 ऑगस्ट पर्यन्त खरीप हंगाम 2026 चा पीक विमा भरू शकतील. (Crop Insurance)








